shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

संगमनेर येथे गेल्या अनेक वर्षांपासून अवैधपणे सुरु असलेले वाईन देशी दारू दुकान तात्काळ बंद करा - बानोबी शेख

पालिका व पोलीस प्रशासनाला आजी - माजी नगरसेवकांसह स्थानिकांचा घेराव 
उचित कारवाईसाठी आंदोलनाचा इशारा 

संगमनेर / प्रतिनिधी:
संगमनेर बुद्रुक येथील ... वाईन नामक एक वाईन देशी दारू दुकान हे गेल्या अनेक वर्षांपासून अवैधपणे चालू आहे, याबाबत नगरपालिका प्रशासनला वारंवार अर्ज देऊनही कारवाई होत नाही, कारण खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे सदरील वाईन देशी दारु विक्री लायसन जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळविलेले असल्याचे समजते?

सदरील लायसन मिळविण्यासाठी लायसन धारकाने नगरपालिकेचे शिक्के, लेटर पॅड, त्याचप्रमाणे कराची पावती असे विविध दस्तावेज हे खोटे आणी बनावट पद्धतीने बनून लायसन मिळविणेकामी संबंधित कार्यालयाकडे सादर केले असल्याचा खुलासा नगरपालिकेने केलेला आहे. असे खोटे आणी बनावट शिक्के,लेटर व दस्तऐवज बनवणाऱ्यावर नगरपालिकेने योग्य ती कारवाई करावी, तसेच सदरील वाईन देशी दारू दुकान चे लायसन धारक यांनी शासन ला खोटे कागदपत्र देऊन सरकारी जागेवरती अतिक्रमण करून देशी दारूचे दुकान खोट्या लायसनवर आजपर्यंत चालवत आहे, दारुबंदी विभाग अहिल्यानगर व  जिल्हाअधिकारी अहिल्यानगर अशा या दोन्ही विभाग आणी शासनाची देखील फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गंभीर गुन्हा नोंद करण्यात यावा व त्यांचे लायसन कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे, या अनाधिकृत दारूच्या दुकानाविषयी काल संगमनेर शहरामध्ये अतिक्रमणाची कारवाई सुरू असताना स्थानिक नगरसेवक नेते पुढारी ग्रामस्थांनी प्रशासनाला घेराव घालत सदरच्या अवैध दारू दुकानाचा आपण त्वरित बंदोबस्त करून अवैध दाखले देऊन वर्दळीच्या व स्थानिकांना त्रास होईल अशा ठिकाणी टाकलेल्या दारूची दुकान बंद करण्याची मागणी करण्यात आली. सदरील... वाईन नावाच्या या देशी दारू दुकानाविरोधात सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख यांचेसह सहकाऱ्यांची तब्बल एक वर्षापासून योग्य पाठपुराव्याची लढाई सुरू आहे, आज दारूबंदी विभाग जिल्हा अधीक्षक अहिल्यानगर, संगमनेर नगरपालिका मुख्याधिकारी संगमनेर, शहर पोलीस निरीक्षक आणी संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी यांना आमरण उपोषणाचे निवेदन देऊन उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे.
close