नवी दिल्ली येथील पुस्तक विक्री प्रदर्शनास चांगला प्रतिसाद
नवी दिल्ली : महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त १७ ते १९ जानेवारी दरम्यान महाराष्ट्र सदन येथे आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक विक्री प्रदर्शनास चांगला प्रतिसाद मिळाला. येथे आलेल्या प्रकाशकांनीही समाधान व्यक्त केले.
प्रदर्शनात मराठी साहित्य, काव्यसंग्रह, चरित्रे, इतिहास, बालसाहित्य आणि विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध होती. मराठी भाषिक आणि दिल्लीतील साहित्यप्रेमींनी या प्रदर्शनालाभेट दिली.
या उपक्रमामुळे मराठी वाचक आणि प्रकाशक यांच्यातील संवाद अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे. पुस्तक विक्रीस मिळालेला प्रतिसाद प्रकाशकांनीही समाधान व्यक्त केले असून अशा प्रकारच्या प्रदर्शनांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रकाशकांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने राजधानी दिल्लीत पुस्तक विक्री प्रदर्शनाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रकाशकांनी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे आभार मानले.
*वृत्त विशेष सहयोग
जि.मा.का.अहिल्यानगर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111