शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) सामाजिक बातमी
संस्था ही श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीचे कायम कर्मचाऱ्यांची नोंदणीकृत सहकारी संस्था असुन संस्थेमार्फत संस्थेच्या सभासदांकरीता अनेक उपक्रम राबविले जातात. त्यानुसारच नुतन चेअरमन श्री विठ्ठल तुकाराम पा. पवार यांचे संचालक मंडळाने निवडणुकीमध्ये जामीनदार मुक्त संस्था करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार संस्था व सभासद यांचे प्रत्येकी ५० टक्के रक्कमेतुन जामीनदार मुक्त संस्था होणे करीता नैसर्गिक मृत्यु विमा कवच प्राप्त होणे कामी प्रत्येक सभासद व संस्थेचे कर्मचारी यांचा नैसर्गिक मृत्यु विमा प्रत्येकी रु.१० लाखाचा घेवून एक ऐतिहासीक निर्णय घेतला व तो राबविला. संस्थेच्या सभासदांचा अथवा कर्मचारी यांचा कोणत्याही प्रकारचा मृत्यु झाल्यास त्यांचे वारसास संस्थेचे येथे कर्ज बाकी वजा जाता शिल्लक रक्कम याद्वारे मिळणार आहे. परंतु दुदैवाने माहे नोव्हेंबर २४ ते जानेवारी २५ या कालावधीत संस्थेचे कै. रावसाहेब प्रभाकर गाडेकर, कै. कांता बाबुराव देशमुख व कै. सुरेश तान्हाजी हुसळे यांचा मृत्यु झाला. नुकतेच तिनही क्लेम मंजुर झ गालेले आहेत. त्यातील कै. रावसाहेब प्रभाकर गाडेकर यांचे नावे संस्थेचे संपूर्ण कर्ज सदरचे विमा रक्कम रु.१० लाखातुन वर्ग करण्यात आल्याने त्यांचे जामीनदार पुर्णपणे या कर्जातुन मुक्त झालेले आहेत. तर कै. कांता बाबुराव देशमुख यांचे कोणतेही कर्ज नसल्याने संस्थेचे त्यांचे वारसास आज दि.२०/०१/२०२५ रोजी संस्थेच्या व्यवस्थापन कमीटी सभेप्रसंगी त्यांना चेकद्वारे रु.१० लाखाचा चेक प्रदान करण्यात आला. तर कै. सुरेश तान्हाजी हुसळे यांचेकडे संस्थेचे कर्ज बाकी असल्याने सदरचे विमा रक्कमेतुन सदरचे कर्ज वसुल होवून त्यांचे वारसांनाही आज दि.२०/०१/२०२५ रोजी संस्थेचे कमीटी सभेत रु.९ लाख ४१ हजार चेकद्वारे प्रदान करण्यात आले. या विमा योजनेमुळे जामीनदार हे पुर्णपणे सुरक्षीत झालेले असुन त्यांचे कर्ज ही पुर्णपणे सुरक्षीत झालेले असल्याने संस्थेची थकबाकीही राहणार नाही. त्यामुळे संस्थेच्या सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. याकामी एक्सपेरिटस इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि, या कपंणीचे प्रतिनिधी श्री हितेश ठक्कर साहेब, व श्री जयेश पांडे साहेब यांचे बहुमुल्य सहकार्य लाभले.
मयत सभासदांचे वारसांना विमा चेक प्रदान करतांना प्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन पोपटराव कोते संचालक महादु कांदळकर, कृष्णा आरणे, भाऊसाहेब कोकाटे पा., संभाजी तुरकणे पा., देविदास जगताप, विनोद कोते पा., मिलींद दुनबळे, तुळशिराम पवार पा., रविंद्र गायकवाड, भाऊसाहेब लवांडे पा., इकबाल तांबोळी, गणेश आहिरे, सौ. सुनंदा जगताप पा., लता बारसे पा., श्री रंभाजी गागरे, तज्ञ संचालक भाऊसाहेब लबडे पा. तसेच सचिव नबाजी डांगे, सह. सचिव विलास वाणी तसेच सर्व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.