shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीतही जिल्हा भाजपमय करण्याचा संकल्प करु- विखे पाटील यांचे प्रतिपादन

शिर्डी ( प्रतिनिधी ) :-विधानसभेच्या निवडणुकांत राज्यात व जिल्ह्यामध्ये महायुतीला मिळालेल्या विजया प्रमाणेच शिर्डीमध्ये पक्षाचे  महाविजयी अधिवेशन ऐतिहासिक करुन, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीतही जिल्हा भाजपमय करण्याचा संकल्प करु असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या १२ जानेवारी रोजी शिर्डी येथे संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे अधिवेशनाची नियोजन आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत ना. विखे पाटील बोलत होते. यावेळी पक्षाचे प्रदेश महामंत्री आ. विक्रांत पाटील, आ. शिवाजीराव कर्डीले, महामंत्री राजेश पांडे,माधवी नाईक, विजयराव चौधरी, संजय केणेकर, प्रदेश कार्यालयीन प्रमुख रवीजी अनासपुरे, डॉ. सुजय विखे पाटील, सौ. स्नेहलता कोल्हे, वैभवराव पिचड यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
       या अधिवेशनास पक्षाचे केंद्रीय गृह, सहकार मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय अध्यक्ष मंत्री जे.पी नड्डा, नितीन गडकरी, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह केंद्र व राज्यातील मान्यवर नेते, मंत्री उपस्थित राहणार आहेत. 
       ना. विखे पाटील यांनी पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांनी या आधिवेशनाचे यजमानपद शिर्डीला दिल्याबद्दल आभार व्यक्त करुन, हे आधिवेशन न भूतो न भविष्यती अशा पध्दतीने आम्ही यशस्वी करु, विधानसभा निवडणूकीत महायुतीला ज्या पध्दतीने विजय मिळविला तसेच हे आधिवेशन सुध्दा ऐतिहासिक करण्याचा प्रयत्न या जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते करतील अशी ग्वाही त्यांनी दिली. 
        राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर आणि भारतीय जनता पक्षाला प्रथम क्रमांकाने मिळालेल्या जागा यासर्व वातावरणात शिर्डीमध्ये होत असलेले आधिवेशन अधिक उत्साहाने करण्याचा निर्णय पक्षाच्या प्रदेश कार्यकारणीने घेतला आहे. या राज्यस्तरीय आधिवेशनास पक्षाचे सुमोर वीस हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील अशा पध्दतीचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी आजच्या बैठकीत विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून, या समित्यांकडे आधिवेशनातील विविध विभागांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. 
         नुकत्याच मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर तसेच अगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीची रणनिती या आधिवेशनात ठरविली जाणार असल्याने या अधिवेशनात ठरविली जाणार असल्याने या आधिवेशनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
          पक्षाच्या सर्व राज्यस्तरीय पदाधिका-यांनी आज राज्यातून येणा-या प्रतिनिधींच्या नोंदणी कक्ष, निवास, भोजन व्यवस्था, व्ही आय पी ची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था याचे नियोजन करुन आधिवेशनाच्या प्राथमिक तयारीवर शिक्कामोर्तब केले आहे. याठिकाणी भाजपा सरकारच्या कामगिरीचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. मीडिया व सोशल मीडिया तुन प्रसिद्धीवर भर देण्यात येणार आहे. शिर्डी विमानतळ, शिर्डी व कोपरगाव रेल्वे स्टेशन, शिर्डी बसस्थानक येथे स्वागत कक्ष उभारले जाणार आहे.
        माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील हे अधिवेशनाचे संयोजक असणार असून त्यांचे मार्गदर्शनाखाली  भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने शहर सजावट केली जाणार असून जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर हे संयोजक असतील तर महिला मोर्चा वर नोंदणी कक्षाची जबाबदारी दिली असून कांचनताई मांढरे या प्रमुख असतील, भोजन व्यवस्था प्रमुख जिल्हा सरचिटणीस सिताराम भांगरे तर व्ही.आय.पी. व्यवस्था प्रमुख म्हणून माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, स्टेज व्यवस्था युवा प्रदेश उपाध्यक्ष किरण बोराडे, मंडप व्यवस्था योगीराज परदेशीं, रवींद्र गोंदकर, दर्शन व्यवस्था अशोक पवार, मीडिया व्यवस्था भाऊसाहेब वाकचौरे, पत्रकार कक्ष राम आहेर, सोशल मीडिया अंतू वारुळे, पार्किंग व्यवस्था जगन्नाथ गोंदकर, शिर्डी विमानतळ स्वागत कक्ष प्रमुख कानिफ गुंजाळ आदी व्यवस्था पाहणार आहेत. त्यांच्या समवेत दहा, पंधरा जणांची टीम आहेत. या प्रत्येक टीमला प्रदेशातून एक पदाधिकारी मार्गदर्शक राहणार आहेत.
       स्वागत जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग व प्रास्तविक जिल्हाध्यक्ष श्री. नितीन दिनकर यांनी केले, सूत्रसंचालन योगीराज परदेशीं यांनी तर आभार रवी बोरावके यांनी मानले.

भाजपा प्रदेश अधिवेशनास विधानसभेच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर " महाविजयी प्रदेश अधिवेशन " असे नाव दिले असून शिर्डीत होणाऱ्या अधिवेशनास साईबाबांच्या मंत्रा नुसार ' श्रद्धा अन सबुरी, भाजपाची महा भरारी ' असे घोषवाक्य दिले आहे.
      - महामंत्री राजेश पांडे
close