सामान्य कुटूंबात जन्म घेवूनही उतुंग महत्वाकांक्षा बाळगण्याची जिद्द ठेवून प्रतिकूल परिस्थितीत प्रविण वृतपत्र सृष्टीत संपादक म्हणून काम करित आहे. सुरुवातीला ब्रेड विकण्यापासून त्यांचा प्रवास सुरु झाला. तो आज संपादक व आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स मिडीया स्नींग करण्यापर्यंतचा त्यांचा कालानुक्रम आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातील असलेले प्रवीण वसंतराव सावरकर यांच्या घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. वडीलांचा सलून व्यवसाय असतांना वडीलांसोबत सलून व्यवसाय करून कुटुंबाला हातभार लावण्याची उदरनिर्वाह करून सुद्धा पुरेसा पैसे मिळत नव्हते. त्यामुळे कमावलेल्या पैशांमध्ये कुटुंबाचा प्रपंच होत, नसल्यामुळे सोबतीला ब्रेड विक्रीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला.
प्रवीण सावरकर यांनी वरुड नगरीतील देवते बेकरी, होले बेकरी, पालेकर बेकरी या कंपनीमधील ब्रेड विकून कुटुंबात हातभार लावण्याचा प्रयत्न सुरु केला. यासोबतच अगदी सकाळी वृत्तपत्र वाटप ते ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत भड यांच्याकडे पेपर वाटप करण्याचे काम सुद्धा त्यांनी केले.आर्थिक परिस्थितीची आस प्रत्येक वेळेस प्रवीणला भासत होती. परंतु आपले मनोधैर्य खचु न देता प्रवीण काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. प्रविणला दोन भाऊ आहे. मोठा भाऊ शिक्षण घेऊन कॅसेट लायब्ररीमध्ये काम करून स्वतःहाच्या मेहनतीवर शिक्षक झाले तर. दुसरा भाऊ सलून व्यवसाय मध्ये उत्तम कारागिर असुन अमरावती येथील रंगोली लॉन मागे अंबाई जेष्ट पार्लर चे प्रशस्त शॉप आहे, प्रविणचे वास्तव्य हे.पी डी कन्या शाळेच्या मागील परिसरामध्ये आहे. सोबतच आज प्रविणने आई - वडिलांच्या आर्शीवादाने एन. टी.आर. शाळेमागे आदित्यनगरमध्ये नवीन घराचे बांधकाम केले आहे. आज प्रविण च्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सौभाग्यवती सौ.निलम प्रविण सावरकर या सुद्धा काम करीत आहेत. त्या सुद्धा सांयदैनिक वरुड केसरी या वृत्तपत्राच्या मालक आहेत. पत्रकारीता क्षेत्रामध्ये त्यांचे सुद्धा मोठे सहकार्य त्यांना मिळत आहे. सोबतच या मिडीया क्षेत्रामध्ये प्रविणचे अत्यंत जवळचे मित्र व लहान भावा समान असलेले त्याचे सहकारी दैनिक वरुड केसरी चे सह संपादक निखिल बावणे यांची त्यांना क्षणो क्षणी साथ लाभते असे. प्रविण चे एकूण सहा जणांचे कुटुंब वरुडला राहतात तर दोन भाऊ आपल्या परिवारासह अमरावती ला स्थाईक झालेले आहेत. वरुडला त्यात आई-वडील पत्नी व दोन मुलं व प्रवीण असा हा परिवार आहे. प्रविण हा कामात कुठलाही कमीपणा न बाळगता हा अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा आहे. आपल्या घरची परिस्थिती नाजूक असली तरी, चेहऱ्यावर कधी तसा भावाने दिसू देत नाही." पत्रकारीता हे सेवा असून सार्वजनिक जीवनातील समस्यांना संपादकीय सेवेतून वाचा फोडण्यासाठी प्रविण सावरकर हे सक्रीयपणे काम करीत असल्यामुळे जनमानसात त्यांनी प्रतिष्ठानियती आहे.
सुरुवातीपासून प्रवीण ला लेखन साहित्य वाचनाची आवड होती. त्यातूनच शहरातील प्रतिष्टीत ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत भड यांनी प्रविणला मातृभूमी पेपरच्या जुनं ते सोनं वाळ्याचे फोटो काढण्याचे, माहिती गोळा करण्याचे काम दिले. पत्रकारिता क्षेत्रांमध्ये कसे काम करायचे? याचे मार्गदर्शन चंद्रकांत भड यांनी केले. त्यामुळे चंद्रकांत भड यांना प्रविण आपले पत्रकारीता क्षेत्रामधील गुरु मानतात. त्यानंतर विविध कार्यक्रमाचे संकलन पत्रकारीतेच्या माध्यमातुन प्रवीण ने केले.
वरुड शहरातील जागृत विद्यालयांमध्ये प्रविण आपले शिक्षण पूर्ण केलं.त्यानंतर
कुठेतरी आपल्या लेखनशैलीला व कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने प्रविण ने साप्ताहिक चुडामणी दर्शन या नावाचे वृत्तपत्र सुरू केले व पत्रकारीता क्षेत्रामध्ये पहिले पाऊल ठेवले. नागरिकांच्या विविध समस्यांना न्याय देण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी व विविध मागण्या पेपरच्या माध्यमातून प्रशासकीय करून शासनाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी पर्यंत पोहोचवण्याचे काम
प्रविणने केले.
प्रविणचे सामाजिक योगदान
आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाला आपल ही काही देण असते आपण सुद्धा सामाजिक प्रवाहामध्ये आलो पाहिजे, हा उद्देश बाळगून शहरांमध्ये सर्वप्रथम वरुड नाभिक दुकानदार संघटना त्यांनी स्थापन केली, त्याच्या माध्यमातून व्यवसाय व नाभिक बांधवांना एकत्रित करण्याचा मोठा प्रामाणिक प्रयत्नही त्यांनी केला आहे. यामध्ये श्री रामकुष्ण शिरूळकर, राजीव बाभुळकर,भालचंद्र चौधरी, मुरलीधर आसोलकर, अशोकराव साखरकर, स्व रुपेश निभोरकर, बंडू राऊत, अंबादास पाटील, रमेश माथुरकर, दिपक पापडकर यांनी सुध्दा मोठी मोलाची मदत केली. त्यांच्या कामामध्ये त्यांचे जीवलग मित्र असलेले लोकेश अग्रवाल, निखिल बावणे व तुषार खासबागे यांचे क्षणोक्षणी खंबीर साथ लाभते.
पत्रकारीता क्षेत्रामध्ये काम करत असतांना पत्रकारीता क्षेत्रामध्ये विविध पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेले आहेत. समाजभूषण पुरस्कार, स्व. पांडूरंगजी बहुरूपी पत्रकार पुरस्कार २०२२ .नाभिक समाज भुषण पुरस्कार .नाभिक रत्न पुरस्कार .उत्कृष्ठ पत्रकारीता पुरस्कार, अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेच्या वतीने मुंबई येथे पत्रकार भुषण पुरस्कार प्रविणला मिळालेला आहे.
सांयदैनिक वरुड केसरी. व साप्ताहिक चुडामणी दर्शन,चुडामणी न्यूज पोर्टलच्या माध्यमातुन प्रविण सर्वसामान्य लोकांना न्याय मिळून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे, आज प्रविणच्या माध्यमातुन अनेक लोकांना न्याय मिळत आहे याच प्रयत्नातून वरुड शहरामध्ये समाज भवनाची उपलब्धी झाली, नाभिक समाजामध्ये प्रविण काम करत असून संत नगाजी महाराज समाज भवनाचे काम पूर्ण झाले आहे व राहीलेले कंपाऊड वॉल सुद्धा काही दिवसांमध्ये पुर्ण होणार आहे असे त्यांनी सांगितले. समाज भवनामुळे नाभिक समाजाचे लहान मोठे कार्यक्रम सुद्धा होत आहे. अश्या विविध कामामध्ये प्रविण सतत अग्रेसर असून विविध सामाजीक संघटनेमध्ये प्रतिनिधीत्व करीत आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या प्रदेश उपाध्यक्षपद देखील प्रविण सावरकर यांनी भुषवले आहेत. तसेच वरुड नाभिक दुकानदार संघटनेच्या सचिव, संत नगाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष , ज्ञानेश्वरी बहुदेशीय शिक्षण संस्थेचे सचिव, महिला उत्थान शिक्षण पुनर्वसन जलालखेडा या संस्थेचे विश्वस्त, श्री शंभूशेष महाराज देवस्थान वर्ध मनेरी चे सहसचिव, ऑरेज सिटी मराठी संपादक व पत्रकार सोसायटी सचिव, गुरुकुंज सोशल असोसिएशचे सचिव या पदावर सध्या प्रविण काम करत आहे. ४ जानेवारी १९८२ ला प्रविणा चा जन्म वरुड या गावी झाला. लहानपणा पासुनच प्रविण हा अत्यंत मनमिळाऊ असल्यामुळे कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करण्यात प्राविण्य पात्र आहे. पत्रकारीता क्षेत्रामध्ये आज प्रविणकाम करत असतांना त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्यांच्या पत्रकारितेतून समाजाला नवी दिशा मिळाली आहे. अन्यायाला वाचा फोडण्याचे काम ते करीत आहे. त्यांच्या सोबतीला जे जुळले ते तुटलेले नाही. समाजाचे नाते त्यांनी घट्ट पकडलेले आहे. माझा संबंध जवळपास प्रवीणसोबत दहा वर्षांपासून आहे. या व्यक्तीने कुणाचे मन दुखावली नाही. नेहमी सहकार्य करण्याची भूमिका, परिस्थिती कमकुवत असतांना सुद्धा सहकार्य, जेव्हा जेव्हा या जगात ईश्वर समाजाला आवश्यक असतो, तेव्हा ईश्वर माणूस रूपाने जन्म देऊन या माध्यमातून सेवा करण्याचे काम करतो त्यातलाच मला प्रवीण वाटतो.
दैनिक वरुड केसरी या वृत्त पत्राचे संपादक प्रविण वसंतराव सावरकर यांच्या वाढदिवसानिमित्य अभिष्टचिंतन ! प्रत्येक वाढदिसांगणिक तुमच्या यशाच आभाळ अधिक अधिक विस्तारित होत जाओ! तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुल सदैव बाहरलेली असावीत, आपले आयुष्य सुख समृद्ध आणी ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा ! आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता, सिंहगडाची शोर्यता आणी सह्याद्रीची उंच लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास तुळजाभवानी माता उदंड आयुष्य देवो ही सदिच्छा!
शेषराव गो.कडू - वरुड
*प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111