प्रतिनिधी - एरंडोल: माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून एरंडोल शहरातील सर्व पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात पत्रकारांना शाल, पुष्पगुच्छ, व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती व मान्यवर...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे होते. व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून सुप्रसिद्ध विधिज्ञ ॲड. मोहन शुक्ला, माजी तहसीलदार अरुण माळी, सामाजिक कार्यकर्ता कृष्णा भाऊ सोनार, तसेच ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव अहिरराव, आल्हाद जोशी, रतिलाल पाटील, व तालुकाध्यक्ष सिताराम मराठे उपस्थित होते.
प्रमुख वक्त्यांचे विचार...
प्रा.शिवाजीराव अहिरराव यांनी पत्रकारितेचे महत्त्व विशद करताना म्हटले की,"पत्रकारिता म्हणजे काटेरी मुकुट धारण करून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न."त्यांनी पत्रकारांना निडरपणे आपले कार्य सुरू ठेवण्याचा सल्ला दिला.माजी तहसीलदार अरुण माळी यांनी महामार्गा वरील अपघातांच्या समस्येवर प्रकाश टाकत पत्रकारांनी अपघातांविषयी प्रभावीपणे बातम्या प्रसिद्ध केल्यामुळे अधिकाऱ्यांना जागे करण्याचे कार्य उत्तम रीतीने केले असल्याचे कौतुक केले.ॲड.मोहन शुक्ला यांनी पत्रकारांना कायदेशीर साहाय्याचा विश्वास दिला आणि त्याचबरोबर बातम्या देताना कायदेशीर परिणामांची जाणीव ठेवण्याचा सल्ला दिला.
अध्यक्षीय भाषणात अमोल कोल्हे यांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करत पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये सुसंवादाची गरज अधोरेखित केली.
सन्मान व सत्कार...
प्रमुख अतिथींसह प्रा.शिवाजीराव अहिरराव,आल्हाद जोशी,रतिलाल पाटील,प्रा.सुधीर शिरसाठ,कमर अली सय्यद,कैलास महाजन,जावेद मुजावर,संजय चौधरी, प्रवीण महाजन, दीपक बाविस्कर, पंकज महाजन,उमेश महाजन,कुंदन सिंग ठाकूर, प्रमोद चौधरी, शैलेश चौधरी, प्रकाश शिरोळे, दिनेश चव्हाण,स्वप्निल बोरसे, यांच्यासह इतर अनेक पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन...
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश पाटील यांनी केले, तर प्रस्तावना व आभार प्रदर्शन भरत महाले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी,संभाजी पाटील,प्रा. आर. एस. निकुंभ,अरुण गुजर,मधुकर महाजन, राहुल महाजन, सुनील महाजन, अनंत सोनवणे, जगदीश पवार, राजधर महाजन , नितीन ठक्कर, विज्ञान पाटील, तुषार शिंपी,भरत महाले, सोपान माळी अरुण नेटके, प्रभाकर महाजन आदींसह इतर कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले
सामाजिक बांधिलकीचा संदेश...
या कार्यक्रमातून पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला. माहिती अधिकाराच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.
उपस्थित मान्यवर...
कार्यक्रमात पाचोरा येथील पंकज पाटील,जळगाव येथील काशिनाथ सपकाळे,व गुणवंतराव सोनवणे यांचा देखील सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम एरंडोल शहरातील सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा ठरला.