पिंपळनेर - येथील ॲड. संभाजी पगारे यांच्या मातोश्री स्वर्गीय मुक्ताई यशवंत पगारे यांचे दिनांक २१ जानेवारी २०१५ रोजी निधन झाले आहे.त्यांच्या दहाव्या पुण्यस्मरणा निमित्त दिनांक २१ जानेवारी २०२५ वार मंगळवार रोजी दुपारी ठिक २:०० वाजता दाजी साठे इंग्लिश मिडीयम स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी "आई" या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा इयत्ता ५ वी ते ८ वी पहिला गट , इयत्ता ९ वी ते १२ वी दुसऱ्या गटात होणार असून विजेत्या दोन्ही गटातील प्रथम क्रमांकास १००० रुपये रोख, द्वितीय क्रमांक ५०० रुपये रोख स्वर्गीय मुक्ताई पगारे यांचे नावे बक्षिसे दिली जाणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार वितरण सोहळ्यात वक्तृत्वाची संधी दिली जाणार आहे. वक्तृत्व स्पर्धा प्रवेश नोंदणी साठी अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथील मुख्याध्यापक उमेश माळी चलभाष्य ८२६३०४१५९४ व प्रा.राजेंद्र सोनवणे चलभाष्य ९३०७६७६२५१,प्रा.प्रविण पगारे चलभाष्य ९४०५१७३५५७, प्रा.व्हि.डी.ठाकरे चलभाष्य ८३८१०३२३१४ यांच्या सोबत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिनांक २५ जानेवारी वार शनिवार रोजी दुपारी ठिक ३:०० वाजता विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तिंचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.यात उत्कृष्ट कार्य करून कौशल्य व प्रावीण्य मिळवणारे उद्योजक प्रविण पवार, विक्रीकर अधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल विवेक नंदन, तसेच संशोधन आणि लेखन कार्यांत सहभागी होऊन पुस्तक व पेपर प्रसिद्ध केले यामुळे प्राचार्या इंद्रायणी वरंदळ यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
दर वर्षी स्वर्गीय मुक्ताई पगारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदर्श माता पुरस्कार दिला जातो.या वर्षांचा आदर्श माता पुरस्कार केशरबाई निंबा पगारे यांना जाहीर झाला असून.सदर कार्यक्रमात तो प्रदान केला जाणार आहे.
तरी पिंपळनेर व परिसरातील नागरिकांनी व रसिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती अॅड संभाजी पगारे प्रदेश सचिव भारतीय किसान मोर्चा, विठ्ठलराव पगारे, डॉ.सतिश पगारे, पिंपळनेर भा.ज.पा.अध्यक्ष डॉ .राजेंद्र पगारे यांच्या वतीने करण्यात आली आहे.