आमदार हेमंत ओगले यांच्या आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
तळागाळातील सर्वसामान्य नागरिक हा केंद्रस्थानी ठेवून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याच्या सूचना आमदार हेमंत ओगले यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. काल (दि.२५ जाने.) येथील प्रशासकीय इमारत येथे आमदार ओगले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली यावेळी युवा नेते करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे, सभापती सुधीर नवले, माजी सभापती वंदनाताई मुरकुटे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, शिवसेना नेते संजय छल्लारे, अशोक (मामा) थोरे आदि उपस्थित होते.तर बैठकीस प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्यासह प्रशासनातील सर्वच विभागप्रमुख हजर होते.
आमदार ओगले म्हणाले की, आजच्या बैठकीत पदाधिकारी व नागरिकांनी जे प्रश्न उपस्थित केले तो प्रत्येक प्रश्न मार्गी लावा तसेच अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून जनहिताचे कामे करावे. शासनाच्या माध्यमातून ज्या काही लोकहिताच्या योजना असतील या शेवटच्या घटकापर्यंत कशा पोहोचतील याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी येणाऱ्या काळात आमदार आपल्या दारी ही संकल्पना राबविणार असल्याचे आमदार ओगले यांनी सांगितले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले की, लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पाणी मागणी अर्ज हे केले पाहिजे जेणेकरून आपल्या हक्काच्या पाण्याचा अधिकार अबाधित राहील तसेच ससाणे यांनी श्रीरामपूर शहरातील रस्ते, आरोग्य व पाणीपुरवठा याकडे लक्ष वेधले.
जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर यांनी शेतकऱ्यांना होणाऱ्या विजेच्या त्रासाबद्दल मुद्दे उपस्थित केले आपल्याही मतदारसंघात सोलर फिडर, सोलर सबस्टेशन ही योजना राबवण्यात येऊन तसेच संविधान भवनासाठी आलेला निधी नगरपालिने जागा नसल्याचे कारण दिल्याने निधी परत जाण्याच्या मार्गावर असल्याचे समजते तरी याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेण्याची मागणी केली. तसेच आ.ओगले यांनी उच्चदाब वीज केंद्राचे काम मार्गी लावल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.
पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांनी देखील शेतकरी व जनहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले विज, कृषी, महिला व जल जीवन मिशनचे प्रश्न मांडत आपली भूमिका स्पष्ट केली.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांनी जलजीवांच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करून मुरमाच्या गैरव्यवहाराबद्दल तर जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिघे यांनी मतदारसंघात झालेल्या निष्कृष्ट दर्जाच्या रस्त्यांचे कामे चव्हाट्यावर आणली आहे.
शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय छल्लारे यांनी श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळ्याबाबत आमदार व अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. तसेच अंजुमभाई शेख यांनी शहरातील टी.पी स्कीम, आरोग्य व विकास कामांचे प्रश्न उपस्थित केले.
यावेळी बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, खंडेराव सदाफळ, विलास दाभाडे, राजू चक्रनारायण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष लकी सेठी, शिवसेना तालुकाध्यक्ष लखन भगत, रितेश रोटे, पंडित मामा बोंबले,भारत भवार यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, सरपंच विविध पदाधिकारी सोसायट्यांचे चेअरमन व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी विजेचे, पाटपाणी घरकुल तसेच पोलीस प्रशासन संदर्भात अनेक मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले.
*अतिक्रमणाबाबत व्यापाऱ्यांच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घ्या - करण ससाणे*
नुकत्याच पालिकेने दिलेल्या अतिक्रमणाबाबतच्या नोटीशीबाबत आमदार हेमंत ओगले यांनी मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून व्यापाऱ्यांच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण ससाणे यांनी केली
*आढावा बैठक हाउसफुल*
*जनता दरबारात रूपांतर*
गेल्या अनेक वर्षांपासून मतदारसंघातील नागरिकांना आपले प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध नव्हते मागील लोकप्रतिनिधींकडे प्रश्न घेऊन जाणे म्हणजे सवाल जवाबचा सामना करावा लागायचा परंतु आमदार ओगले यांनी आढावा बैठकीसाठी आलेल्या सर्वच नागरिकांच्या व पदाधिकाऱ्यांच्या समस्या विनम्रपणे जाणून घेतल्या व त्यावर मार्ग काढण्याचे आश्वासित केल्याने सदरील आढावा बैठकीचे जनता दरबारात रुपांतर झाल्याचे बघावयास मिळाले. या बैठकीस शहर व तालुक्यातील त्रास तथा अन्यायग्रस्त, आणी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आदि उपस्थित होते.
*विना तोंडसुख झालेल्या आढावा बैठकीची तालुकाभर मोठी चर्चा
सदरील बैठक ही दुपारी १२ वाजता सुरु होवून सायं. ५ वाजेपर्यंत चालली, तब्बल ५ तास चाललेल्या या बैठकीस संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांसह शहर व तालुक्यातील नागरीक एकाच ठिकाणी बसून राहीले, प्रत्येक खात्याच्या संबंधित अधिकाऱ्याने आपापल्या खात्याचा आढावा सादर केला,तर नागरीकांनी कामांतील उणीवा दर्शवित त्या दुर करण्याप्रश्नी अनेक समस्या मांडल्या यावर आमदारांनी सर्व विभागातील अधिकाऱ्यांना आदेशित करत समस्या दुर करण्याचे सांगितले. कोणावरही विनाकारण तोंडसुख न घेता
मोठ्या संयमी आणी समंजसपणे पार पडलेली ही आढावा बैठक अधिकारी, कर्मचाऱ्यांसह समस्त जनतेस प्रथमच सुखद असा अनुभव देवून गेल्याने शहरासह तालुकाभर या बैठकीची मोठ्या कुतुहुलतेने चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे.
या बैठकीस शहर व तालुक्यातील त्रस्त तथा अन्यायग्रस्त, आणी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आदि उपस्थित होते.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111