shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज पंचायत समिती मध्ये पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा 02 चे मंजुरी पत्र व पहिला हप्ता वाटप!

प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी* :-
देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचा यांचा महत्वकांक्षी प्रकल्प सामान्य बेघर लोकांना नवीन घर हा संकल्प काल पूर्ण झाला .महाराष्ट्रातील 20 लाख निराधारांना एकाच वेळी घर देण्याचे स्वप्न काल पूर्ण झाले.
   

    
दि:22/02/25 रोजी महाराष्ट्रात एकाच वेळी सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद च्या सर्व कार्यालयामध्ये 10 लाख लाभार्थींना पंतप्रधान आवास योजनेचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयदीप गोरे यांच्या उपस्थितीत बालेवाडी पुणे येथे पार पडला. 

एकाच वेळी 10 लाख लाभार्थ्यांना DBT प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यात टाकण्यात आले  आशा प्रकारचा इतिहासात नोंद राहील असा कार्यक्रम हा पहिल्यादाच महाराष्ट्रात घेण्यात आला .ग्रामीण भागातील 02 ऱ्या टप्प्याच्या या कार्यक्रमात उर्वरित 10 लाख लोकांना पण लवकरच निधी वितरित करण्यात येणार आहे. तसेच जे लोक या यादीत नाहीत त्यांचा पण पुनरसर्वे लवकरच करण्यात येणार आहे .असे पंतप्रधान कार्यालयाने कळवले आहे .

100 दिवसाच्या या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करून तालुक्यातील 4716 लाभार्थ्यांना निधी देण्याचं काम केज पंचायत समितीने केले असून त्यांच्या या कामाचे कौतुक करण्यात आले. केज च्या गटविकास अधिकारी श्रीमती दिवाने मॅडम ,अतिरिक्त गटविकास अधिकारी श्री राठोड यांनी उत्कृष्ट नियोजन करून 150 ते 200 लाभार्थींना प्राथमिक स्वरूपात मंजुरी पत्र देण्यात आले .                           

या कार्यक्रमास केज विधानसभा मतदार संघाच्या आ .नमिताताई मुंडदा यांचे प्रतिनिधी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ . वासुदेव नेहरकर, भाजपा तालुका अध्यक्ष भगवान केदार,भाजपा जेष्ठ नेते सुनील गलांडे, नेताजी शिंदे, वसंत केदार,सुदाम पाटील,पंडित सावंत,व इतर मान्यवर उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिंदे सर यांनी तर आभार श्री काळे यांनी केले.
close