shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

चांगला माणूस होण्यासाठी सेवाधर्म व पुस्तक वाचण्यातून मार्ग सापडतो - कवी प्रा. विवेक उगलमुगले

शिर्डी (संजय महाजन): आई-वडिलांची सेवा ही भगवंताच्या सेवेची समरूप साधणारे सेवा धर्म असून नव्या पिढीतील युवकांनी आईचे मांगल्ये व बापाचे अस्तित्व राखून ठेवण्याची जबाबदारी असून चांगला माणूस होण्यासाठी सेवा धर्माबरोबरच पुस्तक वाचण्यातून मार्ग सापडतो असे मत साहित्यिक, कवी प्रा. विवेक उगलमुगले यांनी सामोडे पिंपळनेर येथील दाजी साठे इंग्लिश मीडियम स्कूलच्या सभागृहात आयोजित मुक्ताई पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना व्यक्त केलेयेथील महात्मा फुले विद्या प्रसारक संस्थेच्या सामोडे - पिंपळनेर रस्त्यावरील येथील  पगारे आश्रमशाळा संकुलाच्या इमारतीत विविध क्षेत्रात नैपुण्य प्राप्त व्यक्तिंना व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना स्मृती चिन्ह,सन्मान पत्र पुष्पगुच्छ  देऊन मुक्ताई पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

       हा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात साहित्यिक विवेक उगलमुगले हे अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी मुक्ताईंच्या  व सरस्वती प्रतिमेचे  पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी आदर्श माता मुक्ताई पुरस्कार येथील श्रीमती केशरबाई  पगारे,पदोन्नती पुरस्कार विलास नंदन, नवउद्योगजक  म्हणून  प्रविण पवार यांना  व प्राचार्य इंद्रायणी वरंदळ यांचे प्रतिनिधी म्हणून नितीन वरंदळ या पुरस्कारार्थींना सन्मान पदक , स्मृती चिन्ह व सन्मान पत्र, पुष्पगुच्छ देऊन उपस्थित व्यक्तिंच्या हस्ते गौरवण्यात आले.
वक्तृत्व स्पर्धेतील विजेते  प्रथम पल्लवी विजय सूर्यवंशी, लहान गटात द्वितीय भूमिका चंद्रकांत सोनवणे. गटात यश ज्ञानेश्वर घरटे,मालती सोनू बागूल,, मोठ्या गटात कु अपूर्वा योगेश अमृतकर, रांगोळीतून कलाकृती  साकारणारी कु. यांना स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र, पूष्प देऊन गौरवण्यात आले.

      यावेळी प्रा.वैशाली पाटील,अश्विनी बोरस्ते, पुरस्कारार्थी विक्री कर अधिकारी विकास नंदन , प्रविण पवार,केशरबाई पगारे यांनी मनोगत व्यक्त केले. 
याप्रसंगी महात्मा फुले  विद्या प्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट संभाजीराव पगारे यांनी प्रास्ताविक केले.  तर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून धुळे येथील समुपदेशक प्राध्यापक वैशाली पाटील, अश्विनीताई बोरस्ते,कवी संजय आहेर, तानाजी खोडे, साहित्यिक साहेबराव नंदन, ए टी पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव बच्छाव, सौ पुष्पा पगारे, विजयराव सोनवणे, विष्णू जिरे पाटील,मिलींद महाजन, प्रमोद गांगुर्डे,माजी कामगार आयुक्त बी. एम. नंदन, सासले , प्राचार्य एस. टी. पाटील, विठ्ठल पगारे, छाया पगारे, स्वप्नील पगारे, बाबा पठाण, एस.एल. सासले,संध्याराणी सासले, एस.ए. पाटील,डी.एल. मानकर, यशवंतराव नवरे,राजेंद्र सताळे,माजी सरपंच साहेबराव गवळी, प्रदीप कोठावदे, हनुमंत वाडिले, पी एच जाधव विलास माळी, एस. बी मोरे, राजेंद्र क्षीरसागर, उपशिक्षक श्री. शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक जाधव ,श्री, गवळी, हनी सोनवणे, डॉ.सतीश पगारे, राजेंद्र सोनवणे, दिलीप घरटे,राजेंद्र गवळी प्रा. सविता पगारे, शिक्षक जगताप माजी मुख्याध्यापक श्री गवळी  आदी मान्यवर उपस्थित होते. 

     परीक्षक म्हणून प्रा. त्रिशीला साळवे यांनी काम पाहिले होते. प्रास्ताविक अॅड. कवी संभाजी पगारे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सविता पगारे  व उमेश माळी यांनी केले, आभार प्रदर्शन श्री माळी यांनी केले.
close