काल राधेय.. दानशूर सुर्यपुत्र कर्णाचे जीवनावरची कादंबरी वाचली..
श्रीकृष्णाने एक सुंदर प्रसंग सांगितला.. निरोप झटकण घ्यावा म्हणजे त्रास होत नाही..
नाशिक ला नोकरी ला होतो.. संघटनेचा धनाजी होतो.. माझी कोपरगाव ला बदली झाली.. सगळे नाही म्हटले.. संघटनेला गरज आहे म्हणू लागले.. लढण्याची तयारी सुरु झाली..
अचानक एका महत्वाचे मिटींग मध्ये मी माझे मत मांडू लागलो.. अपमान सहन झाला नाही.. झटक्यात नाशिक सोडले.. कोपरगाव ला आलो.. नाशिक ला गेल्या ३५ वर्षात पाऊल ठेवला नाही..
कोपरगाव ला आलो परत संगमनेर, श्रीरामपूर ला संघटनेचे जाळे उभे केले.. महाराष्ट्रात एक चांगले लढवैय्ये युनिट उभे केले..
अशाच एका क्षणी नेतृत्वा वरुन वाद उभा राहिला.. पण नेतृत्व बदलात झालेले राजकारण सहन झाले नाही.. संघटनेचा एका क्षणात निरोप घेतला... वीस वर्ष उलटले पण खेद वाटला नाही..
राजकारणात काही दिवस रमलो.. संवत्सर गावात मी चांगले काम करीत होतो.. पण वातावरण आवडले नाही.. केवळ दोन वर्षात निरोप घेतला.. पुन्हा त्याचे स्मरण नाही..
कोपरगाव शहरात साईगाव पालखी सोहळ्यात मी काम करीत होतो.. प्रथम मी एकटाच ट्रॅफिक नियंत्रण चे काम करीत होतो.. मी सोहळ्यात कोणाला ओळखत नव्हतो.. हळूहळू मी धार्मिक कामात रमत गेलो अडकत गेलो...
मला निरोप घ्यावा असे वाटले.. २०२१ ला मी त्या सोहळ्यातुन झटकण निरोप घेतला... आज मी पुन्हा एक स्वतंत्र आझाद व्यक्तिमत्व आहे... आणि आझाद च जगणारा..
मी सामाजिक काम करताना कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र यांना माझ्या कामाचा त्रास होऊ लागला.. कोणी राजकारणी, राजपत्रित अधिकारी त्यांना त्रास देतात.. असा त्यांचा दावा..
मी गेली एकवीस वर्षे सगळ्यांचा निरोप घेत आलो.. प्रत्येकाचा निरोप घेताना इतका झटकण घेतला, कारण अपमान मला सहन होत नाही.. आणि ज्याचा निरोप घेतला त्याचेकडे परत वळून नाही पाहिले...
श्रीकृष्णाचा संदेश मी अथक वापरत आलो.. वापरत राहणार...
मला आज राधेय कादंबरी वाचताना लक्षात आले.. मी कर्णाच्या भुमिकेत अनेक वेळेस गेलो.. अपमान गिळलेत, पुन्हा उभा राहिलो.. नवीन अपमान पचवायला.. नवीन निरोप झटकण घ्यायला..
कारण कर्ण आपल्या तत्वांना, निष्ठेला, कष्टाला, सामर्थ्याला, मानाला, ज्ञानाला, शौर्याला बांधलेला होता व स्वयंप्रकाशी होता त्याने देवा कडून देखील दान घेतले नाही ... तोच आचार आणि विचार माझा देखील..
संजय बबुताई भास्करराव काळे...