येवती:-
आमदार अभिमन्यू जी पवार प्राथमिक शिक्षणभूमी असलेल्या येवती (ता. तुळजापूर) गावात आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमास निमंत्रणाचा स्वीकार करून उपस्थित राहिले.
पवार यांचे पिताजी ह. भ. प. दत्तात्रय पवार गुरुजी यांनी जिल्हा परिषद शिक्षक म्हणून तुळजापूर तालुक्यातील येवती या गावात जवळपास 15 वर्ष विद्यादानाचे कार्य केले, अभिमन्यू जी पवार यांचे प्राथमिक शिक्षणही येवती गावातील जिल्हा परिषद शाळेतच झाले. औसा मतदारसंघाचा आमदार म्हणून सलग दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांची प्राथमिक शिक्षणभूमी असलेल्या येवती गावातील नागरिकांनी आयोजित केलेल्या स्नेहमिलन कार्यक्रमास उपस्थित राहून कौटुंबिक सत्कार विनम्रतापूर्वक स्वीकारुन आनंद द्विगुणित केला.या कौटुंबिक स्वरूपाच्या कार्यक्रमाला माजी मंत्री मा.श्री मधुकररावजी चव्हाण यांनी आवर्जून उपस्थित राहत शुभाशीर्वाद दिले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक जुन्या सवंगड्यांची येथे भेट झाली, बालपणीच्या अनेक आठवणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने जाग्या झाल्या. या कार्यक्रमासाठी पुढाकार घेणारे श्री बाळासाहेब गायकवाड, त्यांचे सर्व सहकारी आणि येवती ग्रामस्थ यांचे त्मयानी नापासून आभार मानले. यावेळी धाराशिव जिल्ह्यातील युवा नेतृत्व श्री मल्हार राणाजगजितसिंह पाटील, सेवानिवृत्त न्यायाधीश मा श्री डी. एन. भरगंडेजी, कौटुंबिक स्नेही श्री नारायण नन्नवरे, मा. जिल्हा परिषद सभापती श्री मुकुंददादा डोंगरे, सरपंच सौ पूजाताई अमोल गवळी, उपसरपंच श्री प्रसन्ना गायकवाड, श्री दीपकदादा अलुरे, श्री सचिन रोचकरी, श्री. सचिन पाटील, श्री सुनील शिंदे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.