श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर येथील स्व. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी
महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय सब ज्युनियर वयोगट ८ (आठ) ते १४ (चौदा) या वयोगटाखालील विद्यार्थ्यांच्या राहुरी कृषी विद्यापीठ येथे नुकत्याच झालेल्या ॲथलेटिक्स सामन्यांत घवघवीत यश संपादन केले.
यावेळी चि.पियुश बिडलान (इ.तिसरी) याने गोळा फेक खेळ प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. तर चि.विराज काळे (इ.तिसरी) याने ५० (पन्नास) मीटर शर्यतीमध्ये तिसरा क्रमांक मिळवला. तसेच कु.स्वरा कुहीले हिने गोळा फेक स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवला. पंढरपूर येथे होणाऱ्या आगामी राज्यस्तरीय सामन्यांसाठी यशस्वी झालेल्या खेळाडूंची निवड झाली आहे. प्रसंगी विविध स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी बजावली. यावेळी विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक (एनआयएस कोच) अजय आव्हाड, मयूर जाधव यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके, व्हा. चेअरमन डॉ. प्रेरणाताई शिंदे,खजिनदार डॉ. राजीव शिंदे, प्राचार्य विनोद रोहमारे, समन्वयक मंगेश साळुंके, मनिषा उंडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111