प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज शहारातील कृष्णा अर्बन को-आॕपरेटिव्ह बँकेला १०० कोटी पर्यंत ठेवी असलेल्या बँकेमधून उत्कृष्ट नागरी सहकारी बँक म्हणून सलग सहाव्यांदा "बँको ब्ल्यू रिबन" पुरस्काराने लोणावळा येथे सन्मानित करण्यात आले आहे.
हा पुरस्कार अविज पब्लिकेशन कोल्हापूर यांच्या वतिने दिला गेला आहे.अविज पब्लिकेशन कोल्हापूर यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे दिला जाणारा "बँको ब्ल्यू रिबन" पुरस्कार सलग सहाव्यांदा केजच्या कृष्णा अर्बन को - आॕपरेटिव्ह बँकेला मिळाला असून हा पुरस्कार १०० कोटी ठेवीच्या साईज पर्यंतच्या ठेवी असणाऱ्या बँकेला दिला जातो.लोणावळा येथे बँकेचे प्रतिनिधी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव तानाजी लक्ष्मणराव यांनी स्विकारला असून बँकेला सलग पाच वेळेस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
बॅकेला मिळालेल्या पुरस्कारा बद्दल बँकेचे संस्थापक अध्यक्ष विक्रम (बप्पा) मुंडे,बँकेचे चेअरमन विजयकांत मुंडे, उपाध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी, युवा नेते अतुल (दादा) मुंडे,बँकचे मुख्यकार्यकारी अधिकारी वसुदेवराव मुंडे , बँकेचे सर्व संचालक मंडळ,ठेवीदार,कर्जदार, हितचिंतक,बँकेचे सर्व कर्मचारी,पिग्मी प्रतिनिधी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.