shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

काळया बाजारात जाणारा राशनचा तांदूळ परतूर पोलिसांनी पकडला. १० लाखाचा तांदूळ केला जप्त,


शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा:
परतूर: दि. २/२/२५ रोजी सकाळी ११.०० गोपनीय माहिती मिळाली की,  माजलगाव  येथून नागपूर येथे राशनचा तांदूळ काळा बाजारात जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांना मिळाली त्यावरून वाटूर फाटा येथे नाकाबंदी करून ट्रक क्रमांक - mh-२३ AU९३९३ ही पकडून पाहणी केली असता त्या मध्ये तांदूळ मिळून आल्याने नायब तहसीलदार पुरवठा विभाग परतूर  श्री. दादमिया शेख परतूर यांना समक्ष घटनास्थळी पाहणी करून अहवाल सादर केला आहे. सदर ट्रक मध्ये ३० टन राशनचे तांदूळ किंमत १०,५०,०००/-₹ आणि ट्रक किंमत ३० लाख ₹ असा एकूण- ४०,५०,०००/-₹ चा मुद्देमाल मिळून आल्याने गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात आली आहे, चालक नामे १) राजेंद्र बळीराम पोटेकर रा. सिपगाव ता. गेवराई आणि क्लिनर नामे २) अमोल रावसाहेब उबाळे रा. वरखेड ता. शेवगाव तसेच ट्रक मालक आणि राशन तांदूळ चे मालक असे ४ आरोपी चे विरुद्ध गुन्हा नोंद करून कारवाई केली आहे, सदरचा मुद्देमाल हा परतूर येथील शासकीय गोडाऊन मध्ये जमा केला आहे.

              सदरची कारवाई ही मा. श्री. अजय कुमार बंसल, साहेब, पोलिस अधीक्षक जालना, 
मा. श्री. आयुष नोपाणी, साहेब, अप्पर पोलिस अधीक्षक जालना, मा. श्री. दादहरी चौरे, साहेब, उप विभागीय पोलिस अधिकारी, परतूर यांच्या मार्गदर्शनाखाली 
१) एम.टी.सुरवसे, पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन परतूर. 
२) दादामिया शेख, नायब तहसिलदार परतूर. 
३) विठ्ठल केंद्रे, पो.उप.निरिक्षक 
४) राऊते पो. उप. निरीक्षक
५) सफौ/ नंदू खंदारे 
६) पोह/ किरण चव्हाण
७) पोका/ नरेंद्र चव्हाण
८) भगवान खालापूरे ऑपरेटर.
९) चालक पोह/ धोत्रे 
यांनी केली आहे.
close