सौ.किरण वाघ/ देऊळगांव राजा
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नंदाताई कायंदे, संस्थेचे सचिव सतीश कायंदे, अनंत देशमुख, शिव व्याख्याते, सुखदेव बुरकुल, दिलीप वाघ, नंदू शिंगणे, दिपक दंदाले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे, रासेयो कार्यक्रम अधिकारी किरण ठाकरे यांनी शिवप्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करत शिवजन्म उत्साहास सुरुवात केली. या जन्मोत्सवास छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ यांची वेशभूषा परिधान करून अभिशेक चांदणे व समीक्षा गिरी यांना विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर सलामी देत महाविद्यालयात मावळ्यांसह प्रवेश केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती नंदाताई कायंदे यांनी विद्यार्थ्यांना शिवचरित्र एकदा तरी वाचावे जेणेकरून आयुष्य जगत असताना आलेल्या कठीण प्रसंगांना कशाप्रकारे सामोरे जावे याचे ज्ञान मिळेल असे विद्यार्थ्यांना सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन मेहेत्रे यांनी आपल्या मनोगतात शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेवर आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शिवव्याख्याते अनंत देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण कशाप्रकारे कठीण प्रसंगातून उभे राहिले याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पवन भवर यांनी केले यांनी.
यावेळी प्रा अश्विनी जाधव, रासेयो सह कार्यक्रम अधिकारी, प्रा योगेश जगदाळे, प्रा विकास मस्के, प्रा अरुण शेळके, प्रा सचिन सोळंकी, प्रा श्वेता धांडे, प्रा अनिता सानप, प्रा सोनाली इंगळे, प्रा प्रणाली पानेरकर, प्रा वैभव देशमुख, प्रा किशोर कवर, बद्रीनारायण काळे, सुवर्णा उमाळे, अर्चना जत्ती, कल्पना मुख्यदल, गबाजी लाड, संजय लाड, श्रीहरी काळुसे व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
वृत्त विशेष सहयोग
पत्रकार अजीजभाई शेख - राहाता
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111