प्रा.महादेव साबळे यांच्या सेवापुर्तीचा केला गौरव!!!
प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या जडण घडणीमध्ये सर्वाधिक वेळ विद्यार्थी महाविद्यालयात ,पर्यायाने प्राध्यापकांच्या संपर्कात असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्राध्यापकच जबाबदार असतात . म्हणूनच शिक्षण हेच सामाजिक प्रगतीचे माध्यम आहे असे प्रतिपादन छ.शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव रमेशराव आडसकर यांनी केले.ते वसंत कनिष्ठ महाविद्यालय,केज येथे प्रा.महादेव गोविंदराव साबळे यांच्या सेवा गौरव कार्यक्रमात बोलत होते.व्यासपीठावर प्राचार्य प्रकाश धेंडे, प्राचार्य डॉ.माधवराव फावडे,रंजीत दादा आडसकर ,प्रा.महादेव साबळे व इतर उपस्थित होते.
आडसकर पुढे म्हणाले की प्रा.साबळे सरांनी या ठिकाणी निष्ठेने, प्रामाणिक शैक्षणिक योगदान देवुन विद्यार्थी घडविले. अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा येथील एका शेतकरी कुटुंबातुन पुढे येवुन उच्च शिक्षण घेवून प्रा. महादेव साबळे यांनी या ठिकाणी एकतीस वर्षे शैक्षणिक अध्यापनाचे योगदान दिले.
या प्रसंगी प्राचार्य धेंडे, प्राचार्य माधवराव फावडे यांनीही विचार मांडले.या प्रसंगी प्रा.महादेव साबळे यांनी 1993 ते 2025 या एकतीस वर्षातील काळातील आठवणींना उजाळा दिला.संस्थेने दिलेली शाबासकीची थाप हीच माझी पुढील काळातील ऊर्जा असेल असे ही सांगितले.
या कार्यक्रमात कु.वैष्णवी जोगदंड या विद्यार्थीनींने आपले मनोगत व्यक्त करून आपल्या गुरुविषयीची आत्मियता व्यक्त करून वातावरण भावुक केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.शाहू साखरे तर आभार उपप्राचार्य प्रा.हेमंत देशमुख यांनी केले.