shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

एरंडोल येथे सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया - गंधमुक्ती व पित्रांना हेल्मेट वाटप !..

 भावडांनी शेतात वृक्ष लागवड करून दिली वडिलांना आदरांजली !...
एरंडोल येथे सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया - गंधमुक्ती व पित्रांना हेल्मेट वाटप !..

प्रतिनिधी एरंडोल - तालुक्यातील माळीवाडा शांतीनगर परिसरातील रहिवासी पुंडलिक व इच्छाराम झोपडू महाजन यांचे बंधू व हिरालाल व रवींद्र पितांबर महाजन यांचे वडील निसर्गवासी पितांबर झोपडू महाजन यांचे वृद्धापकाळाने दि २६ फेब्रुवारी २०२५ रोजी निसर्गविलीन झाले त्यांची दशक्रिया व गंधमुक्ती कार्यक्रम महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक सत्यधर्म म्हणजेच सत्यशोधक पद्धतीने विधीकर्ते शिवदास महाजन एरंडोल व भगवान रोकडे चाळीसगाव यांच्या हस्ते पार पडला त्यांच्या स्मृतिप्रित्तर्थ कुटुंबातील सदस्यांच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आले. व पित्रांना हेल्मेट वाटप करण्यात आले.

एरंडोल येथे सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया - गंधमुक्ती व पित्रांना हेल्मेट वाटप !..

भावडांनी शेतात वृक्ष लागवड करून दिली वडिलांना आदरांजली !...

    सदर कार्यक्रमास सत्यशोधक सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी सर्व "साक्षी जगत्पती त्याला नकोच मध्यस्थी "हा सत्यशोधक समाजाचा मूलमंत्र आहे याप्रमाणे सर्वांनी विधी करावेत व शोषणापासून मुक्त व्हावे असे प्रतिपादन पाटील यांनी केले. यानंतर लक्ष्मणराव पाटील यांनी महात्मा फुले व सावित्रीमाईंचे विचार प्रेरणादायी आहेत या विचारांवर मार्गक्रमण करावे यानंतर पाटील यांनी सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. सत्यशोधक विधीकर्ते शिवदास महाजन यांनी सार्वजनिक सत्यधर्माची प्रार्थना हे सामूहिक गायन केले. सत्यशोधक भगवान रोकडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धेपासून दूर रहा व शोषणातून मुक्त व्हा !... सत्यशोधक विचारच आपल्याला तारतील असे प्रतिपादन रोकडे यांनी केले.

               याप्रसंगी निवृत्त तहसीलदार अरुण माळी, समाजभूषण देविदास महाजन, माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, रविंद्र महाजन, सत्यशोधक समाज संघाचे संघटक हेमंत माळी, राजेंद्र वाघ, संजय महाजन, व सगे सोयरे,आप्तेष्ट व समाज बांधव उपस्थित होते. सदर कार्यक्रम सत्यशोधक पद्धतीने केल्याने सर्व शहरातील बंधूंनी कौतुक केले या पुढील सर्व विधी हे महात्मा फुले यांनी स्थापन केलेले सार्वजनिक सत्यधर्म म्हणजे सत्यशोधक पद्धतीने करायला पाहिजे सर्व उपस्थित त्यांनी ठरवले वरील कार्यक्रमाची प्रेरणा सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष अरविंद खैरनार, सचिव डॉ.सुरेश झाल्टे, जळगांव जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांच्याकडून मिळाली.

close