shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

दुटप्पी आ.सुरेश धस यांचा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा.वडार समाजाची मागणी


नांदेड, दि.११/०२/२०२५
     परभणी प्रकरणात वडार युवक व भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी ची हत्या करणाऱ्या पोलिसांना मोठ्या मनाने माफ करा असे म्हणणाऱ्या दुटप्पी आ.सुरेश धस यांचा निषेध करीत वडार समाजाने तीव्र संताप व्यक्त करून त्यांचा राजीनामा मागितला आहे.


      वडार समाज संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे प्रदेश मुख्य संघटक डाॅ.श्रावण रॅपनवाड यांनी प्रसिद्धी पत्र काढून आ.सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणी झालेल्या दंगलीचा ठपका ठेवत निष्पाप वडार युवक भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी यास ताब्यात घेऊन पोलिसी अत्याचारात त्याचा बळी घेण्यात आला. त्यानंतर परभणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना मुख्यमंत्र्यांनी निलंबित केले.
       काल पोलीस अधिकारी व तीन कर्मचारी अशा चौघांचेही निलंबन झाले. राज्यभर गाजत असलेल्या एका हत्येबद्दल व मारेकऱ्यांबद्दल एक भूमिका आणि सोमनाथ सूर्यवंशी च्या पोलिसी अत्याचारातील मृत्यू बाबत मारेकऱ्यांना माफ करा अशी दुटप्पी भूमिका घेणाऱ्या आ.सुरेश धस यांचा तीव्र निषेध वडार समाजाकडून करण्यात येत आहे. केवळ जात बघून बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या जातीयवादी आ.सुरेश धस यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ घ्यावा. आ.सुरेश धस यांनीही आपल्या भूमिकेबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर उभारून वडार युवक भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांची माफी मागून राजीनामा द्यावा, अन्यथा वडार समाज राज्यभर आ.सुरेश धस यांच्या विरोधात आंदोलन पुकारेल असा इशारा वडार समाज संघाचे मुख्य संघटक डाॅ.श्रावण रॅपनवाड यांनी दिला आहे.
close