दिनांक 11 ते 18 फेब्रुवारी च्या दरम्यान नामांकित कीर्तनकाराचे कीर्तन, भागवत कथा व दिवसभर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन..!!
प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी
श्रीक्षेत्र साधु शिवरामपुरीमठ संस्थान वरपगाव येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री संत नागेशपुरीजी महाराज वरपगावकर यांच्या पावन स्मृतीने पवित्र झालेल्या वरपगाव च्या भूमीमध्ये वैकुंठवासी रामकृष्ण महाराज वरपगावकर यांच्या 19 पुण्यस्मरणानिमित्त दिनांक 11.2.2025ते 18.2.2025या कालावधीमध्ये वरपगाव तालुका केज येथे भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदरील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये विविध प्रसिद्ध कीर्तनकाराचे कीर्तनाचे आयोजन केलेले असून याचा अलभ्य लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी अनेक नामंवत
सुश्राव्य कीर्तनामध्ये 11.2.2025 रोजी ह भ प जगन्नाथ महाराज देशमुख पंढरपुरकर यांचे कीर्तन होईल,दिनांक 12 रोजी ह. भ. प. बाळु महाराज गिरगावकर दिनांक 13 रोजी ह. भ. प. मंहत श्रीराम महाराज विडेकर.दिनांक 14रोजी ह. भ. प हरीहर महाराज दिवेगावकर यांचे किर्तन होईल, तसेच दिनांक 15रोजी ह. भ. प विठ्ठल महाराज शास्त्री तर दिनांक 16रोजी ह. भ प.समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन होईल. दिनांक 17 रोजी पांडुरंग महाराज क्षीरसागर यांचे किर्तन होईल तर काल्याचे किर्तन दिनांक 18.2.2025
रोजी मठाधिपती मठ संस्थान वरपगाव महंत ह भ प भगवान महाराज वरपगावकर यांचे कीर्तन होईल.
वरील प्रसिद्ध कीर्तनकार यांचा मेळा या ठिकाणी भरणार असून किर्तन हे संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत होतील.तसेच अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ह. भ. प. प. पु रामकृष्ण महाराज शास्त्री काकाजी आळंदी देवाची याच्या सुमधुर वाणीतून दररोज श्रीमद.भागवत कथेचं प्रवचन दोन ते चार वेळेतच करण्यात येईल.सप्ताहाचे हे विशेष आकर्षण म्हणता येईल. दैनंदिन कार्यक्रमांमध्ये पहाटे चार ते सहा काकडा भजन, सहा ते सात विष्णुसहस्त्रनाम,सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण, बारा ते एक भोजन व विश्रांती,दोन ते चार श्रीमद् भागवत कथा, पाच ते सहा हरिपाठ, सात ते नऊ हरिकीर्तन अशाप्रकारे नियोजन केलेले आहे. त्याचप्रमाणे इतरही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
प्रतिवर्षीप्रमाणे या कार्यक्रमात केज तालुकयातील वरपगाव च्या पंचक्रोशीतील शेकडो गावाच्या भाविक भक्तांचा सागर या ठिकाणी पहावयास मिळत असतो. वैकुंठवाशी नागेश पुरी महाराज वरपगावकर, वैकुंठवाशी रामकृष्ण महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे वरपगाव मठाचे मठाधिपती ह भ प महंत मठाधिपती भगवान महाराज शास्त्री वरपगावकर व वरपगाव ग्रामस्थ यांच्या
वतीने परिसरातील सर्व भाविक भक्तांना आवाहन करण्यात आले आहे.
दररोज संध्याकाळी ठिक 7 वाजता किर्तन सेवा सुरू होणार आहे याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा आसे आवाहन करण्यात येत आहे.