shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतीचे आवर्तन सुटले; तीस दिवस चालणार आवर्तन - आमदार हेमंत ओगले


श्रीरामपूर / प्रतिनिधी: भंडारदारा धरणातून रब्बी हंगामातील शेतीचे आवर्तन सुटले असल्याची माहिती श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांनी दिली.

   सुरू झालेले आवर्तन हे रब्बी हंगामातील शेतीचे शेवटचे आवर्तन असून आवर्तनाचा कालावधी ३० दिवसांचा आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपले भरणे काळजीपूर्वक भरून घ्यावे, सर्व शेतकऱ्यांचे भरणे व्यवस्थितरित्या पूर्ण होईल अशा सूचना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे आमदार ओगले म्हणाले.  


   कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये उन्हाळी हंगामासाठी तीन आवर्तन निश्चित करण्यात आले असून त्याप्रमाणे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे योग्यरीतीने नियोजन करावे जेणेकरून पाणीटंचाई टाळता येणे शक्य होईल असे देखील ओगले म्हणाले.

      सध्या सुरू असलेल्या  आवर्तनातून शेतकऱ्यांनी आपले भरणे भरून घ्यावेत याबाबत काही अडचण असल्यास आमदार कार्यालय अथवा जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन आमदार हेमंत ओगले यांनी केले आहे.

वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
close