पुणे: ग्राम गौरव प्रकाशन,पुणे यांच्या वतीने स्वर्गीय दादासाहेब दिगंबर शंकर पाटील (माजी आमदार, एरंडोल) यांना ‘ज्ञानमर्मी जीवनगौरव स्मृती सन्मान’ मरणोत्तर प्रदान करण्यात आला. हा प्रतिष्ठित पुरस्कार विधानसभेचे माजी अध्यक्ष श्री. अरुणभाई गुजराथी आणि दापोली कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू श्री. मगर साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
हे ही वाचा...
पुरस्कार स्विकारताना यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. अमितदादा पाटील, प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील, तसेच संस्थेचे उपप्राचार्य आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.
स्व. दादासाहेब पाटील यांचे समाजसेवा, शिक्षण व राजकारणातील योगदान अजरामर असून, त्यांच्या कार्याचा गौरव हा पुरस्कार त्यांच्या अमूल्य योगदानाची पावती आहे, असे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले.