shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना आठवड्याला गाव भेटी द्याव्या लागणार..! महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आदेश


शिर्डी ( प्रतिनिधी ) - मंत्र्यांपाठोपाठ आता अधिकारीही जनतेत जाऊन काम करावे लागणार आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकार्‍यांनी दर आठवड्याला गाव भेटी द्या!शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा! असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. 

वेगवान कारभारासाठी महसूल विभागाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय.महसूल विभागाकडून ११ कलमी परिपत्रक जाहीर करण्यात आले या परिपत्रकातील ११ कलमी मुद्दे पुढील प्रमाणे सदर भेटी दरम्यान क्षेत्रीय कार्यालयांचे कामकाज यादृच्छिकरित्या व अचानक तंत्राचा वापर करुन तपासावे. सर्व शासकीय योजनांची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या पार पडत आहे याची सकारात्मक खातरजमा करावी. यात केवळ औपचारिकता न ठेवता क्षेत्रीय यंत्रणेवर नियंत्रण राहील असे नियोजन करावे व दौ-यामध्ये सकारात्मक फलित निघेल याची कटाक्षाने दक्षता घ्यावी. ग्रामपातळीवरील लोकांशी सुसंवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात व त्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न करावेत. संबंधित अधिकारी / कर्मचारी यांची सर्वसामान्यांशी वागणूक सौजन्यपूर्ण व संवेदनशीलतेची आहे,याबाबत जनसंवादातून खात्री करावी. गावपातळीवरील तसेच इतर अधिकारी / कर्मचारी नियमानुसार कार्यक्षेत्रात राहून आपले कर्तव्य निभावत असल्याची खात्री करावी.
      गौण खनिज व महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी नाविन्यपुर्ण संकल्पना राबविणे. तसेच वाळू व गौण खनिज उत्पन्न तपासणी शासकीय धोरणानुसार अंमलबजावणी होत असल्याची खातरजमा क्षेत्रीय भेटी दरम्यान करावी. क्षेत्रीय भेटी देवून नैसर्गिक आपत्तीप्रवण भागात भविष्यात आपत्ती कशी टाळता येईल याच्या उपाययोजना, भौगोलिक व स्थानिक परिस्थिती विचारात घेवून काय उपाययोजना करता येईल ?याबाबत वेळोवेळी त्या त्या मंत्रालयीन विभागास सुचित करुन जिल्हा, उपविभागीय तसेच तालुका पातळीवरील त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचित करुन कामे करुन घ्यावीत.
       मुख्यमंत्री महोदयांनी १०० दिवस कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने महसुली विभागास दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी काटेकोरपणे होत असल्याचा वेळोवेळी आढावा घ्यावा. सर्व कार्यालयांमध्ये कामकाज प्राधान्याने e-Office प्रणाली मध्ये होत आहे याची तपासणी करावी.
सेवा हक्क कायदा पोर्टल, आपले सरकार पोर्टल, पी.जी. पोर्टल, पी. एम. जी पोर्टल, e-mutation, ई-पिकपाणी, e.Qj court  इ. ऑनलाईन सुविधेमधील क्षेत्रीय कार्यालयाच्या कामकाजास अनुसरून निर्गतीचा आढावा घ्यावा. सेतु कार्यालयाची तपासणी करावी व आवश्यक त्या सुचना संबंधितांना कराव्यात.
कार्यालयांची तपासणी करत असताना कार्यालयीन इमारतीतील स्वच्छता,सुविधा इत्यादीची तपासणी करावी. कार्यालयाच्या समोर कार्यालयाचे नाव दर्शविणारे दर्शनीय व सुस्पष्ट नामफलक असल्याची तसेच नागरिकांची सनद, जनतेसाठी त्या कार्यालयामार्फत उपलब्ध होणा-या सुविधा व संपर्क क्रमांक हे त्या त्या कार्यालयासमोर लावण्यात आल्याची खात्री करावी.
    
     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलमंत्री तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष ना चंद्रशेखर बावनकुळे  यांनी अधिकाऱ्यांना जनतेत जाण्याबाबद जे परिपत्रक काढले आहे. त्यामुळे जनता व अधिकारी यांच्यात संवाद निर्माण होईल.
श्री. भाऊसाहेब वाकचौरे पाटील
जिल्हा संयोजक, भाजपा, सोशल मीडिया सेल, उत्तर नगर
close