विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी....
इंदापूर : इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे,
विश्वासराव रणसिंग (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय कळंब अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित आज दिनांक 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजेंद्रकुमार डांगे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे 40 स्वयंसेवक *जय शिवाजी जय भारत* हे ब्रीद घेऊन अतिशय आनंदाने जयंती साजरे करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शुभहस्ते.सचिव, वीरसिंह रणसिंग, व प्राचार्य.डॉ. विजय केसकर, उपप्राचार्य प्रा.ज्ञानेश्वर गुळीग व व्याख्याते प्रा.रवी गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
प्रमुख व्याख्याते, प्रा.रवी गायकवाड यांनी हिमालय जेव्हा जेव्हा संकटात सापडेल तेव्हा तेव्हा हा महाराष्ट्राचा सह्याद्री मदतीस धावून जाईल या विधानाने आपल्या भाषणाची सुरुवात केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकीय पैलूंना उघडून दाखवले. त्याचबरोबर त्यांनी केलेल्या लढाया त्यातील वापरलेली युक्ती आणि आजच्या काळातील संदर्भ अशा वेगवेगळ्या विषयांना आपल्या मांडणीतून त्यांनी स्पर्श केला. संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग यांनी मार्गदर्शनपर आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना परकीय आक्रमणांपेक्षा आपल्या स्वकीय लोकांनी जास्त अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. असा महत्त्वाचा संदर्भ देऊन श्रोत्यांना मार्गदर्शन केले. जवळजवळ 400 वर्षांपूर्वी महाराजांचे कार्य आणि कर्तृत्व काय होतं याचा आढावा त्यांनी घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विजय केसकर यांनी अध्यक्षीय समोरोप करत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील प्रामाणिक आणि होतकरू मावळ्यांचा उल्लेख करून शिवाजी महाराजांचे जीवन आणि कार्य याविषयी आपले मत मांडले.
शेवटी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोवाड्याचे चित्रीकरण सादर करून जयंती सोहळा संपन्न झाला.
प्रा.कपिल कांबळे यांनी स्वयंसेवक आणि पाहुण्यांचे स्वागत केले आणि माय भारत मोहिमेअंतर्गत *जय शिवाजी आणि जय भारत* मोहिमेमागील विचारधारा आणि विचारसरणीबद्दल स्वयंसेवकांना संबोधित केले आणि प्रा. सुवर्णा बनसोडे यांनी आभार मानले.