माझं विद्यापीठ
माझा अभिमान
तुच दिला पुनर्जन्म
तुच दिलं जिवदान
माझं विद्यापीठ
माझा अभिमान
गावगाड्यात नव्हतं कसलंच स्थान
आज तुझ्यामुळेच आहे समाजात मान
माझं विद्यापीठ
माझा अभिमान
आमच्या जिवाची होती शुन्य किंमत
तुच दिली जगायला हिंमत
माझं विद्यापीठ
माझा अभिमान
पुण्यात पाय ठेवायला नव्हतं कसलंच स्थान
तुझ्यामुळं मिळालं साडेचारशे एकराचं हक्काचं रान
माझं विद्यापीठ
माझा अभिमान
घरची परिस्थिती होती बेताची
तू दिली कमवा-शिका योजना हक्काची
माझं विद्यापीठ
माझा अभिमान
पोटात होती भूक भाकरीची
तु भागवत गेला भूक आयुष्याची
माझं विद्यापीठ
माझा अभिमान
रोज मिळत होती साथ शिक्षक-कर्मचाऱ्यांची
आम्ही टाकत होतो कात जुन्या विचारांची
माझं विद्यापीठ
माझा अभिमान...
-विनायक सुभाष मिराबाई लष्कर
मु.पो. चिखली, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर
दिनांक: १० फेब्रुवारी २०२५
वेळ: स. ०८.०९ मी.