जळगाव: वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी एम.आय.डी.सी. पोलिसांनी विशेष कारवाई करत १५ चोरीच्या दुचाकींसह आरोपीला अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या मोहिमेत ₹७.५० लाख किंमतीच्या वाहनांचा छडा लागला.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांनी विशेष पथक तयार केले. संशयित विक्की भालेराव (वय २८, रा. वाघ नगर, जळगाव) यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने ९ गुन्ह्यांची कबुली दिली.
या तपासात जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या घटनांचा मोठा उलगडा झाला आहे. अधिक तपास सुरू असून, पोलिसांची ही यशस्वी कारवाई सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.