shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

रामकृष्ण परमहंस स्मृती सोहळा ९ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी कालावधीत संपन्न होणार,ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांच्या ओजस्वी वाणीतुन विठु माझा लेकुरवाळा कथा!!!.



प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी :-

केज शहराचे सांस्कृतिक व अध्यात्मिक वैभव असणारा तसेच प.पु.स्व. वासुदेवराव खंदारे गुरुजी व रामकृष्ण परमहंस परिवाराच्या गुरुमाता सुमनबाई खंदारे यांच्या आशिर्वादाने गेल्या १७ वर्षापासुन चालत असलेला रामकृष्ण परमहंस स्मृती सोहळा दि.९ फेब्रुवारी ते दि.१६ फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होणार असुन या कार्यक्रमामध्ये विठु माझा लेकुरवाळा ही कथा भावरत्न गुरुदास विवीध कथाकार ह.भ.प. समाधान शर्मा यांच्या ओजस्वी वाणीतुन साकारणार आहे.ठाकुर  रामकृष्ण परमहंस स्मृती सोहळ्याचे मुख्यआकर्षण   हे दि.९ फेब्रुवारी रोजी शोभायाञा मुख्य रस्त्या वरून निघणार असुन या शोभायाञेत विवीध शाळांचे विद्यार्थी आपली कला साकारतात तसेच वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी तसेच वाद्यवृंद आपली कला सादर करतात.देशाच्या काना कोपऱ्यातुन भाविक भक्त या सोहळ्यासाठी आठ दिवस वेळ काढुन आवर्जून उपस्थित राहुन सोहळ्याचा आनंद घेतात.
यावर्षी सोहळ्याचे हे १८ वे वर्ष असुन दि.९ फेब्रुवारी रोजी सकाळी वकिलवाडी हनुमान मंदीर येथुन शोभायाञा निघणार असुन केज शहरातील मुख्य रस्त्या वरून ही शोभायाञा विठाई मंगल कार्यालय, पंढरीनगरी धारुर रोड, केज या ठिकाणी पोंहचणार आहेत.


 त्यानंतर दररोज सकाळी १० ते १०-३० यावेळेत ठाकुर रामकृष्णवचनामृत या ग्रंथाचे पारायण होणार  आहे.त्या नंतर सकाळी ११ ते १ या कालावधीत भावरत्न गुरुदास ह.भ.प.समाधान महाराज  शर्मा यांच्या ओजस्वी वाणीतुन विठु माझा लेकुरवाळा ही कथा होणार आहे.सायंकाळी ५ ते ६ हरीपाठ होणारअसुन   राञी ७-३० ते ९-३० या वेळेत हरीकिर्तन होणार आहेत.या किर्तनसेवेसाठी 
दि.९ फेब्रुवारी रोजी रविवारी ह.भ.प.पांडुरंग महाराज शितोळे आळंदी देवाची दि.१० फेब्रुवारी रोजी सोमवार रोजी ह.भ.प.जयेश महाराज भाग्यवंत मुंबई,दि.११ फेब्रुवारी रोजी मंगळवार रोजी ह.भ.प.उमेश महाराज दशरथे आळंदी देवाची,दि.१२ फेब्रुवारी बुधवार रोजी ह.भ.प. संजय महाराज धोंडगे नाशिक,दि.१३ फेब्रुवारी रोजी गुरुवार रोजी ह.भ.प.रामराव महाराज ढोक नागपुर,दि.१४ फेब्रुवारी शुक्रवार रोजी ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर जळगाव,दि.१५ फेब्रुवारी रोजी शनीवार रोजी ह.भ.प.१००८ महामंडलेश्वर मनिषानंदजी शास्ञी महाराज यांचे हरीकिर्तन होणार असुन दि.१६ फेब्रुवारी रविवार रोजी ह.भ.प.समाधान महाराज शर्मा यांचे काल्याचे किर्तन होऊन नंतर महा प्रसाद होणार आहे.तरी या सोहळ्याचा भाविक भक्तांनी लाभ घेऊन सेवेची संधी द्यावी अशी विनंती रामकृष्ण परमहंस प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात येत आहे.
close