साई कलारत्न समाजभूषण पुरस्कारासाठी
नांव नोंदणी करण्याचे मान्यवरांना आवाहन
विविध अशा ३६ क्षेत्रातील कार्य
असणाऱ्या मान्यवरांचा सन्मान
अजिजभाई शेख / राहाता
जगाला सर्व धर्म समभाव आणी श्रद्धा व सबूरीचा मुलमंत्र देणारे जगद्गुरु श्रीसाईबाबाजींची पवित्र पावन भूमी असलेल्या श्रीक्षेत्र शिर्डी शहरात ओम साई विकास प्रतिष्ठान आणी बी.बी.सी.फिल्म प्रॉडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०३ मे २०२५ रोजी विविध अशा (३६) क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार - २०२५ देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
सदरील साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभ हा शनिवार दि. ३ मे.२०२५ रोजी सकाळी १० वाजता शिर्डीतील हाॅटेल शांतीकमल च्या प्रशस्त दालनात मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. मोठ्या मान - सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा तथा साईं च्या पवित्र पावन भुमित हा राष्ट्रीय पातळीवरील पहिलाच भव्य स्वरुपातील साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
विविध अशा ३६ क्षेत्रातील कार्य
असणाऱ्या मान्यवरांचा सन्मान
या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील (३६ क्षेत्रापैकी) ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे व करत आहेत आशा सर्व मान्यवर व्यक्तींच्या कार्याचा यथोचित सन्मान करुन सिने सृष्टीतील नामवंत सेलिब्रिटीज च्या हस्ते व त्यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने
१) सामाजिक, २) सिनेमा, ३) पत्रकारीता, ४ )शिक्षण, ५) वैद्यकीय, ६) कला, ७) क्रीडा, ८) कृषी, ९) आध्यात्मिक, १०) नृत्य, ११) कथक, १२) लेखन - कथा, कविता, १२) औद्योगिक, १३) बाल कलाकार, १४) लघुउद्योग, १५) कायदे विषयक, १६) वाद्य, १७) तमाशा लोकनाट्य, १८) महिलांसाठी चे कार्य, १९) अभिनय, २०) पेंटींग २१) मेकअप, २२) पार्श्वगायक, स्टेज गायन (सिंगर) निवेदक, २३) व्यवसायिक २४ ) संरक्षण, २५) देश सेवा २६) ड्रायव्हिंग, २७ ) दुग्ध विकास,२८) संशोधन, २९) मूर्तीकार, ३०) कलाकुसर, ३१) उद्योग - व्यापार, ३२) जागरण - गोंधळी, ३३) उत्कृष्ट वक्तृत्व, ३४) रांगोळी, ३५) डिझाईन, ३६) साहित्य आशा विविध ३६ क्षेत्रापैकी कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणाऱ्या मान्यवरांना पुरस्कृत करण्यात येणार आहे.
पुरस्काराचे स्वरूप
या पुरस्काराचे स्वरूप
पुढीलप्रमाणे आहेत
१) एक १५ "इंचं ट्रॉफी - त्यावर पुरस्कारार्थीचे चे नाव व फोटो, २) सन्मानपत्र - त्यावर पुरस्कारार्थीचे चे नाव व फोटो यासोबतच केलेल्या कार्याचा उल्लेख, ३) एक - मोठा कोल्हापूरी रुबाबदार फेटा.४) एक - श्रीसाईंच्या नावाचा उल्लेख असलेली भगव्या रंगाची शाल,५) एक गोल्ड मेडल - त्यावर श्रीसाईंचा फोटो एका बाजूस, तर दुसऱ्या बाजूस प्रतिष्ठान चा लोबो, ६) एक गुलाबपुष्प गुच्छ. ७) नंतर शेवटी पंचपक्वान्नाचे भोजन, आशा प्रकारे पुरस्काराचे स्वरुप आहे.
हा भव्य - दिव्य पुरस्कार सोहळा शिर्डीतील अतिशय अलिशान असलेले ऐ.ग्रेड.चे हाॅटेल शांतीकमल याठिकाणी संपन्न होणार आहे.
या सोहळ्यास संस्थापक अध्यक्ष सुदाम संसारे, उपाध्यक्षा वंदना गव्हाणे, सल्लागार डाॅ.अजय वारुळे, कार्याध्यक्ष राजेश काळे, सरचिटणीस संभाजीराव खैरे,समाधान बिथरे, संयोजक सिध्दार्थ धंदरे, स्वागताध्यक्षा राजनंदीनी आहिरे,अर्चना परदेशी, सुनिता जाधव, विद्या ठाकुर, श्रीमेसवाल,शितल राऊत, कांचन शिरभे, राधा सावरकर, अभिनेत्री सौ. सुनंदा सुर्यवंशी, निशा उर्फ शारदा गावंडे,सुवर्णा रंगारी/डहाट, प्रमिला डोंगरे, ज्योत्स्ना करवाडे, प्रतिभा प्रमोद, अभिनेत्री चित्रा दिक्षित,प्रिया डाखोडे, जयश्री गावित, नृत्यांगना कु.अनुश्री.खांडेकर,सदस्य मीनाक्षी इचके,अंजली महाले, आरती बारवसे, सुरुची वाजपेयी,जिविका सोनार, प्रा.सुरेश गुडदे, सलीम सौदागर, प्रसिद्धी प्रमुख पांडुरंग गोरे, वजीर शेख,दतात्रय आठरे, दिपक भैय्या गरुड,दिलीप वनवे, संपादिका सौ. किरण वाघ, शाम जाधव,भुषन सरदार, तथा सर्व सदस्य या भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्यासाठी परिश्रम घेत आहेत.
लक्की ड्रा - भाग्यवान विजेत्यांना मिळणार गिप्ट
या पुरस्कार सोहळ्याच्या शेवटी १२ भाग्यवान महिलांना लक्की ड्राॅ. पध्दतीने एकुण महिला मधून १२ महिलांच्या चिठ्ठ्या काढुन प्रत्येक महिलास एक पैठणी साडी गिफ्ट देण्यात येणार आहे.त्याच प्रमाणे एकुण पुरुषा मधुन देखील १२ भाग्यवान पुरुषांच्या चिठ्ठ्या काढुन त्यांना एक पुर्ण ड्रेसचे कापड (एक पॅन्ट पीस - एक शर्ट पीस) या प्रमाणे १२ पुरुषांना देखील गिफ्ट देण्यात येणार आहे. अशा प्रकारे हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. तरी लवकरात लवकर वर नमुद क्षेत्रातील मान्यवरांनी पुरस्कारसाठी आपल्या नावाची 9689467506 या मोबाईल क्रमांकावर कॉल करुन नोंदणी करावी असे अवाहनही संस्थापक अध्यक्ष सुदाम संसारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111