श्री छत्रपती हायस्कूल मानकरवाडी येथे शालेय
इंदापूर : श्री छत्रपती हायस्कूल मानकरवाडी ता इंदापूर जिल्हा पुणे या शाळेतील विद्यार्थ्यांना जयराज इरिगेशन सिस्टीम मानकरवाडी व हिंदुस्थान कॅटल फीड यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष , भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष व जयराज इरिगेशन चे सर्वेसर्वा *तानाजी थोरात* यावेळी उपस्थित होते.
यावेळी हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक शंकरराव रुपनवर सर बोलताना म्हणाले तानाजी यांनी प्रजासत्ताक दिन वेळी दिलेला शब्द पाळत दरवर्षी प्रमाणे यंदाही शाळेय साहित्य व प्रत्येकी सहा फुलस्केप वह्या असे वाटप केले . ज्या शाळेतून स्वतः शिक्षण घेतले व परिसरातील विद्यार्थ्याना शिक्षणाची चांगली सोय व्हावी या उद्येशाने तानाजीबापू कायम वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्नशील असतात. त्यासाठी त्याना रुपनवर सर यांनी शुभेच्या दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष तानाजी थोरात म्हणाले
शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लागावा तसेच मुलांमध्ये लेखन कला अवगत व्हावी,हस्ताक्षर सुधारावे व दैनंदिन अभ्यासामध्ये याचा उपयोग व्हावा या हेतूने वह्यांचे वाटप केले. शाळेचा पट
वाढवा यासाठी सर्वानी प्रयत्न करावा.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तानाजी थोरात प्रमुख पाहुणे विलासराव माने, शिवाजीराव रुपनवर,शंकरराव रुपनवर, तानाजी जाधव, संभाजी कणसे,मे.दत्तात्रय पवार, धर्मेश थोरात, योगेश थोरात,जयराज थोरात ,उपमुख्याध्यापक वायसे सर, तसेच यावेळी हिंदुस्तान कॅटल फीड्स चे जनरल मॅनेजर अजय पिसाळ मार्केटिंग ऑफिसर विनोद वसेकर रामदास मिटकरी व विक्री अधिकारी विक्रम गलांडे हे उपस्थित होते