shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्री साई संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी

श्री साई संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने दरवर्षी महिलांसाठी मकर संक्रांत निमित्त हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले जाते मात्र कोरोना काळात महिलांच्या जिव्हाळ्याचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम संस्थेच्या वतीने घेता आला नाही त्यानंतर २०२३ साली झाला आणि पुन्हा २०२४ साली निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला होता त्यामुळे यंदाच्या मकरसंक्रांत समारंभाची महिलांना मोठी उत्सुकता होती कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री साईबाबा संस्थान त्रिसदस्यीय समितीच्या अध्यक्षा तथा माननीय जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू एस शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे वैशिष्ठ म्हणजे प्रथमच हळदी कुंकू समारंभात लकी ड्रॉ च्या माध्यमातून महिलांसाठी पैठण्या बक्षीस म्हणून देण्यात येणार होत्या तर वाण म्हणून श्री साई संस्थान सोसायटीच्या वतीने आकर्षक असे पूजेचे ताट देण्यात आले

श्री साई संस्थान सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांच्यासह व्हा चेअरमन पोपटराव कोते,महिला संचालिका व सर्व संचालक मंडळ,सचिव सह सचिव आणि कर्मचारी यांनी या सोहळ्यासाठी विशेष मेहनत घेतली अध्यक्षीय भाषणात श्रीमती अंजू शेंडे यांनी नियोजनबद्ध आणि कल्पक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे विशेष कौतुक केले तर उपस्थित महिलांना आपण श्री साईबाबांच्या पावन भूमीत आणि साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सकारात्मक ऊर्जेच्या भूमीत राहतो हे आपलं नशीब असल्याचे सांगत नेहमी जीवनाचा मनमुराद  आनंद घ्यावा चेहरा आनंदी ठेवावा आणि आपल्या मुलांवर योग्य ते संस्कार करावे असा सल्ला यानिमित्ताने देत श्रीमती अंजू शेंडे यांनी पुढील वर्षी जर इथेच राहिले तर नक्की पुन्हा कार्यक्रमाला येण्याची मनीषा व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या 

तसेच सौ वंदनाताई गाडीलकर यांनीही महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे पर्वणी असल्याचे सांगत महिलांना या निमित्ताने एकमेकांशी हितगुज साधता येते आणि अनेक महिन्यानंतर महिला एकमेकांना भेटतात त्यामुळे हा सोहळा आनंद द्विगुणित करणारा असल्याचे सौ वंदनाताई गाडीलकर यांनी सांगितले 

चेअरमन विठ्ठल पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की आपण श्री साईबाबांच्या दरबारी नोकरी करतो भाविकांच्या देणगीतून आपल्या सर्वांचे पगार होत असतात त्यामुळे आलेल्या साई भक्तांना जास्तीत जास्त प्रामाणिक आणि चांगली सुविधा देण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो तसेच साई बाबांच्या भूमीत अध्यात्मिक वातावरण असून प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या घरात देखील हिंदू धर्माच्या रीतीरिवाजांचे पालन होत ..नित्य पूजा पाठ होत असते त्यादृष्टीने पूजेचे ताट संक्रांतीचे वाण म्हणून  देत अध्यात्मिक वातावरण निर्मितीचा छोटासा प्रयत्न सोसायटीच्या वतीने केल्याचे सांगितले 

या सोहळ्यासाठी माननीय जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू एस शेंडे, सौ वंदनाताई गाडीलकर,लेखाधिकारी ॲड श्रीमती मंगला वराडे,प्रशासकीय अधिकारी श्रीमती प्रज्ञा महांडुळे, सौ स्मिता ताई भोसले,सौ सुरेखाताई दाभाडे, सौ योगिता ताई माळी,सौ मेघाताई बजाज,संचालिका सौ लता बारसे,सौ सुनंदा जगताप यांसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या 

तर अप्रतिम सूत्रसंचालन करणाऱ्या सौ पिंगळे मॅडम आणि सुचिता कुलकर्णी यांचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले
close