नगर / प्रतिनिधी:
रस्त्यावरती आणली त्यांनी आरती आणि नमाज..
देवाला देव्हाऱ्याचे स्वातंत्र्य उरले नाही...
प्रत्येक श्वास बनतो आहे जात आणि धर्म..
निधर्मी राहण्याचे स्वातंत्र्य उरले नाही... छत्रपती संभाजीनगर येथील विद्रोही कवयित्री डॉ.प्रा.प्रतिभा अहिरे यांच्या अंतर्मुख करणाऱ्या कवितांनी मराठी,हिंदी,उर्दू त्रैभाषिक कविसंमेलनात देशाच्या वर्तमान व्यवस्थेवर हल्ला बोल केला. लोकशाही उत्सव समितीच्या वतीने रावसाहेब पटवर्धन स्मारक समितीच्या सभागृहात निमंत्रित कविंचे कविसंमेलन महात्मा गांधींच्या हौतात्म्य दिनी आयोजित करण्यात आले होते.
लोकशाही उत्सव समितीच्या वतीने संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २५ ते ३० जानेवारी दरम्यान लोकशाही उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या अभियानाचा समारोप त्रैभाषिक कविसंमेलनाने करण्यात आला. या कविसंमेलनात देशाच्या सद्य स्थितीसह मानवी भावभावनांचे प्रतिबिंब उमटले.डॉ. कमर सुरूर यांच्या अध्यक्षतेखाली हे कविसंमेलन संपन्न झाले. सुरूर यांनी
आओ हिंदुस्तान बनाये ऐसा हिंदुस्तान
प्यार का हो कानून जहॉं और सबका हो सन्मान... इन्सानो में फैल रहा है नफरत का आजार..
दिन धर्म में बॉंट रहे हो उलफत का संसार..
दिल का शीशा टूट गया तो रोयेगा भगवान
ही कविता सादर केली.
छत्रपती संभाजीनगर येथील सुनील उबाळे यांनी आर्थिक विषमता आणि गरिबीचे रखरखीत दाहक वास्तव उभं केलं...
"लोक भलेही लपवून ठेवू द्या सोनं ताळेबंद तिजोरीत..
म्या खेळत्या वयात भाकरीचे तुकडे लपवून ठेवले होते उद्याची उपासमार टाळण्यासाठी...
ती भाकर पाऱ्यासारखी निसटत राहिली,
मी मोठा होत गेलो तिला पकडता पकडता...."
या कवितेला उपस्थितांनी मोठी दाद दिली.
आझमगड येथील शायर मुसेब आझमी यांनी या कविसंमेलनात प्रेम भावनेचे रंग भरले..
"आखिरत इंसाफ आशिक का करेगी जब
पहेले मजनू से बुलाया जाएगा मुझको...
हमसे जिंदा है जहाँ में उलफत..
तुझको दुनिया बताए कैसे..?
हैरगी,ऑंख जो दिल के केंद्र...
उसको पानी से बुझाए कैसे...?"
या तरलतम भावनेच्या कवितेलाही रसिकांनी आवर्जून दाद दिली. गोरखपूर येथील शायर नोमान सिद्दिकी यांनी याच आशयाला विस्तारत आपली गझल सादर केली..
"कुछ दिनों से है सुरज कही लापता
चांद भी अपने घर से निकलता नही...
सिर्फ बातो से अब दिल बहलता नही
एक चिंगारी तो लाजमीं है हुजूर
कोई दीपक यहॉं खुद जलता नहीं....."
या प्रेम कवितेलाही मोठी दाद मिळाली..
ज्येष्ठ शायर बिलाल अहेमदनगरी यांनी युवकांच्या विसंगतीवर मार्मिक शब्दांत भाष्य केले व काही प्रेमावरील शेर पेश केले.
"मतला मेरी गझल का सुनया गया मुझे
एक शायरे मिजाज बनाया गया मुझे..
मायूस तो नही हुं नमकीने जिंदगी से
हर गम को सह रहा हूं अपनी हंसी खुशी से...."
यासारख्या कविता,गझलांनी रसिकमनात विचारांची बिजं पेरली.
या कविसंमेलनाचे प्रास्तविक अशोक सब्बन यांनी तर सुत्रसंचालन डॉ महेबुब सय्यद यांनी केले.
कविसंमेलनाच्या प्रारंभी संविधानावर पथनाट्य सादर करण्यात आले.
यावेळी कॉम्रेड स्मिता पानसरे, ऍड. बन्सी सातपुते, चित्रकार राजानंद सुरडकर, ऍड. रवींद्र शितोळे, प्राचार्य जयदीप पवार,संजय झिंजे, आर्किटेक्ट अर्शद शेख, आनंद पुरंदरे, आबीदखान दुलेखान, पारूनाथ ढोकळे, रवी सातपुते, डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे, कॉम्रेड अनंता लोखंडे, आनंद शितोळे, डॉ. सुरेश जैन, संध्या मेंढे, अॕड.विद्या जाधव -शिंदे, आदिंसह मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते. या प्रसंगी सोनाली देवढे-शिंदे यांनी आभार मानले.
लोकशाही उत्सव समितीच्या त्रैभाषिक कविसंमेलनात कविता सादर करताना विद्रोही कवयित्री प्रा प्रतिभा अहिरे मंचावर कमर सुरूर, मुसेब आझमी, नोमान सिद्दीकी,बिलाल अहेमदनगरी, सुनील उबाळे, डॉ. महेबुब सय्यद, आदी...
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111