shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अतिक्रमण हटविताना अंतराची सवलत द्याः

प्रतिनिधी मोहन शेगर सोनई :
घोडेगाव राहुरी, सोनई घोडेगाव कुकाणा राज्य मार्ग क्रमांक ६६ या रस्त्यासाठी अतिक्रमण हटविताना अंतराची सवलत मिळण्याची मागणी चांदा (ता. नेवासा) येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाकडे केली आहे. रस्त्याच्या कडेला असलेली ही शासकीय जागेवरचे अतिक्रमण नसून, स्वतःची मालमत्ता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांचा अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध नसून, विलेल्या नोटीसमध्ये कोठे किती अतिक्रमण हटवावे याची सुस्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि भितीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, घोडेगाव-कुकाणा राज्य मार्ग क्रमांक ६६ जवळ असलेल्या ग्रामस्थ मिळालेल्या नोटीसद्वारे त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या कडेला राहणारे नागरिक कायमस्वरूपी रहिवासी असून, अनेक वर्षापासून स्वतःच्या जागेत राहत आहे. स्वतःच्या जागेत छोटे-मोठे व्यवसाय 
असून, जागेची मालकी असणारे सिटीसों ग्रामपंचायतचे उतारे व शेतीचे सातबारा उतारे नावावर आहे मालमत्ता चारकांनी शासकीय जागेत अतिक्रमण केलेले नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता उपविभाग नेवासा यांनी एक फेब्रुवारी रोजी सर्वच मालमत्ता धारकांना सरसकट अतिक्रमण काढण्याबाबत नोटिसा दिल्या आहेया नोटिसांमध्ये कोणी किती अतिक्रमण केले आहे, हे मात्र स्पष्ट केले नाही. त्यामुळे
सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नागरिकांना बेपर करून त्यांचा व्यवसाय  हिसकावून घेण्याची व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणण्याची प्रशासन अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली कारवाई चालू आहे.

या नोटीस मध्ये किती अंतरापर्यंत अतिक्रमण झाले आहे किंवा किती अंतरापर्यंत अतिक्रमण काढणे आवश्यक आहे? याचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. काही नागरिकांनी स्वतःहून रस्त्याला अडथळा ठरणारा भाग काढून घेण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांचा अतिक्रमण काढण्यास विरोध नाही, फक्त अतिक्रमणचे अंतर है १५ ऐवजी १२ मीटर करण्याची मागणी प्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मीनहाज शेख, तुकाराम चौधरी, आसिफ शेख, बाळासाहेब भोसले, मुनाजीर कुरेशी, सादिक शेख, अकिल शेख, पत्तु हजारे, सावता पुंड, नासिर शेख, असिफ देशमुख, मुसा सय्यद, रईस सव्यद, सोमा जावळे आदी उपस्थित होते.
close