नगर / प्रतिनिधी:
लोकशाही उत्सव २०२५ अहिल्यानगर या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील युवकांसाठी संविधान व धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही या विषयावर व्याख्यानांचे आयोजित करण्यात आले. या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प अरिहंत फार्मसी महाविद्यालय सोनेवाडी अहिल्यानगर येथे गुंफण्यात आले. या व्याख्यानमालेतील प्रमुख वक्ते म्हणून बोलताना अशोक सब्बन म्हणाले,
शासनाचा अधिकृत असा कोणताच धर्म असणार नाही शासकीय धोरणे व कामकाज चालवताना कोणत्या धर्माच्या आज्ञा प्रमाण मानावयाचा नाही तर संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या तत्त्वानुसार राज्यकारभार करणे. सर्व धर्मांचा आदर राखून प्रत्येकाला आपल्या श्रद्धा व उपासना आपल्या पद्धती नुसार आचरण करण्याचा हक्क संविधानाने दिला असून आपल्या आचरणाने दुसऱ्या व्यक्तिच्या स्वातंत्र्याचा संकोच होऊ नये व धोका पोहोचू देऊ नये अशी भूमिका धर्मनिरपेक्ष या तत्त्वाची संविधानाने अपेक्षा केलेली आहे. असे प्रतिपादन अशोक सब्बन यांनी केले.
लोकशाही उत्सव २०२५ अहिल्यानगर या अभियानाच्या भूमिकेचे महत्त्व विशद करताना अभियानाचे अध्यक्ष डाॅ. प्रशांत शिंदे म्हणाले की, लोकशाही उत्सवात सहभागी होत असलेल्या युवकांनी संविधानाच्या सर्व भूमिका समजावून घेणे अपेक्षित आहे.आमजनते साठी देशाचा पारदर्शक कारभार आणि विशेषतः सामाजिक व आर्थिक समता निर्माण करण्यासाठी संविधानाच्या तत्वाच्या आधारे कसे करता येईल, यासाठी युवकांचे योगदान कसे असावे या संदर्भात लोकशाही उत्सव २०२५ या अभियानाची भूमिका स्पष्ट केली. या अभियानात युवकांनी सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन ही डाॅ प्रशांत शिंदे यांनी केले.
या प्रसंगी अरिहंत फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर योगेश बाफना यांनी प्रस्तावना करून स्वागत केले. उपप्राचार्य वर्षा आव्हाड यांनी सूत्रसंचालन केले. तर प्राध्यापक स्वप्निल काळे यांनी आभार मानले. या व्याख्यानमालेसाठी कॉलेजच्या युवकांनी सहभाग नोंदवून मोठा प्रतिसाद दिला.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान
अहमदनगर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस,
श्रीरामपूर - 9561174111