shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांवात महाशिवरात्री निमित्त अखंड हरीनाम सप्ताह शिवपुराण कथेचे आयोजन..!


हिंगोली प्रतिनीधी/विश्वनाथ देशमुख


दि.१९ हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव शहरातील निळकंठ महादेव मंदीर उदासिन नवा आखाडा येथे दि.२० फेब्रुवारी गुरुवार ते दि.२७ फेब्रुवारी गुरुवार पर्यंत महाशिवरात्री निमित्त अखंड हरीनाम सप्ताह शिवपुराण कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांच्या मधुर वाणीतुन किर्तन होणार आहेत.तरी या कार्यक्रमाचा परीसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक सदाशिव अण्णा सोनटक्के,विष्णुपंत देशमुख व निखिल देशमुख यांनी केले आहे.



या अखंड हरीनाम सप्ताह शिवपुराण कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याय आले असुन ह.भ.प.केशव महाराज शास्त्री(आळंदी देवाची) यांच्या मधुर वाणीतुन शिवपुराण कथा दुपारी १ ते ४ या वेळेत ऐकवास मिळणार आहे.खालील प्रमाणे महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे रात्री ९ ते ११ किर्तने होणार आहेत.दि.२० फेब्रुवारी गुरुवार रोजी भागवताचार्य ह.भ.प.पंकज महाराज देशमुख सेनगांवकर,दि.२१ फेब्रुवारी शुक्रवार रोजी ह.भ.प.मुंजाजी महाराज म्हाळसापुर,दि.२२ फेब्रुवारी शनिवार रोजी ह.भ.प.लक्ष्मण महाराज वटकळी,दि.२३ फेब्रुवारी रविवार रोजी भागवताचार्य ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली देशमुख,दि.२४ फेब्रुवारी सोमवार रोजी ह.भ.प.गणेश महाराज आळंदी देवाची,दि.२५ फेब्रुवारी मंगळवार रोजी ह.भ.प.किरण महाराज आळंदी देवाची,दि.२६ फेब्रुवारी ह.भ.प.श्री माऊली महाराज आळंदी देवाची या किर्तनकारांचे किर्तन होणार आहेत.तर दि.२७ फेब्रुवारी गुरुवार रोजी सकाळी १० ते १२ ह.भ.प.श्री माधव बाबा इंगोले यांचे काल्याचे किर्तन संपन्न होणार असुन लगेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सेनगांव परीसरातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक सदाशिव अण्णा सोनटक्के,विष्णुपंत देशमुख व निखिल देशमुख यांनी केले आहे

close