shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

"हरवलेले आई-बाप पुन्हा सापडणार आहेत का?"वसंत हंकरे यांच्या एरंडोलमध्ये भावनिक प्रबोधनाने डोळे पाणावले...!

आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रा.वसंत हंकारे यांच्या एरंडोल येथील व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद...

एरंडोल – आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रा.ति. काबरे विद्यालयाच्या प्रांगणात शिवसेना व युवासेना एरंडोल शहर व तालुका शाखेतर्फे ४ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री 'आई-बाप समजून घेताना' या विषयावर प्रभावी प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध युवा समाज परिवर्तनकार वसंत हंकारे यांच्या सशक्त वक्तृत्वाने उपस्थितांची मने भारावून गेली.
"हरवलेले आई-बाप पुन्हा सापडणार आहेत का?"वसंत हंकरे यांच्या एरंडोलमध्ये भावनिक प्रबोधनाने डोळे पाणावले...!

भावनिक प्रबोधनाने डोळे पाणावले...

सुमारे सव्वा तासाच्या प्रभावी व्याख्यानात हंकारे यांनी आई-वडिलांचे महत्त्व, आजच्या पिढीचे त्यांच्याविषयी बदलते दृष्टिकोन आणि सामाजिक मूल्ये याविषयी मार्मिक विचार मांडले. त्यांच्या आवेशपूर्ण शब्दांनी विद्यार्थ्यांसह पालकांचेही डोळे पाणावले.

"हरवलेले आई-बाप पुन्हा सापडणार आहेत का?"वसंत हंकरे यांच्या एरंडोलमध्ये भावनिक प्रबोधनाने डोळे पाणावले...!

"शाळेच्या चार भिंती चारित्र्यवान माणसे घडवतात, आनंदी घरातच आनंदी मुले घडतात," अशा शब्दांत त्यांनी कुटुंबातील प्रेम व एकोपा यावर भर दिला. "आई-वडिलांना लाचार करू नका, त्यांना मंदिरासारखे जपा," असे सांगत त्यांनी उपस्थित युवकांना विचारप्रवृत्त केले. त्यांच्या सामाजिक जाणिवांना जाग आणणाऱ्या मुद्द्यांमुळे उपस्थित प्रेक्षक भारावून गेले.

"हरवलेले आई-बाप पुन्हा सापडणार आहेत का?"वसंत हंकरे यांच्या एरंडोलमध्ये भावनिक प्रबोधनाने डोळे पाणावले...!

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती...

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अमोल पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून पारोळा नगरीच्या माजी नगराध्यक्षा नलिनी ताई पाटील, ज्ञानेश्वर आमले, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष वासुदेव पाटील, तसेच रेखा चौधरी, सुरेखा चौधरी, मृणालिनी पाटील, सरलाबाई पाटील, छाया दाभाडे, कुणाल महाजन, रवि जाधव, सुदाम राक्षे, प्रभाकर पाटील, गबाजी पाटील, बबलू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवासेना जिल्हाध्यक्ष प्रा. मनोज पाटील यांनी केले. सूत्रसंचालन राकेश पाटील, तर आभार प्रदर्शन प्रा. मनोज पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंद दाभाडे व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

समाजपरिवर्तनासाठी प्रभावी व्याख्यान...

हंकारे यांनी छत्रपती संभाजी महाराज, आईसाहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आठवण करून देत तरुणांना सामाजिक परिवर्तनाचा संदेश दिला. "व्यसन करायचं तर संभाजीसारखं, खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकायचं नाही, रडायचं नाही, लढायचं!" असे ते म्हणाले.

कार्यक्रमास विद्यार्थी, युवक-युवती, पालक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. समाजप्रबोधनासाठी आयोजित या व्याख्यानाने उपस्थितांवर खोलवर परिणाम केला.


close