दोषी अधिकाऱ्यांवर सदोष
मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे,अन्यथा रिपब्लिकन युवा सेनेचे उग्र आंदोलन
श्रीरामपूर / प्रतिनिधी
देशभरात सर्वत्र प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना प्रजासत्ताक दिनीच एका अन्यायग्रस्तास वरिष्ठांच्या जाचास कंटाळून आपले प्राण गमवावे लागले.
याबाबत सविस्तर असे की,२६ जानेवारी २०२५ रोजी भारतीय प्रजास्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील वनक्षेत्रपाल कार्यालयासमोरच वरिष्ठांच्या जाचास कंटाळून एका वन मजुराने आत्मदहन करण्याचे प्रयत्न केला तथा त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यूही झाला. परंतु सदर घटना ही का झाली याचा खुलासा म्हणजे मयत वन मजूर याची आठ महिन्याची मजुरी ही वनक्षेत्रपाल ताहराबाद हे देण्याचे जाणून बुजून टाळाटाळ करत होते.
सदर अन्यायाबद्दल मयत साळुंके यांनी न्यायासाठी शेखर तनपुरे (सहाय्यक वन संरक्षक मालेगांव) व उमेश वावरे (उप वन संरक्षक, नाशिक पूर्व ), वनक्षेत्रपाल, ताहराबाद यांच्याकडे आत्मदहनाची नोटीस दिली होती,परंतु मानवी संवेदना हरपलेल्या व गेंड्याची कातडीच्या वरिष्ठांनी त्याची साधी दखल ही न घेता उडवा उडावीची उत्तरे दिली. वास्तविकपणे आत्मदहन सारखा अर्ज दिल्यावर लगेच चौकशीचे चक्रे फिरवून पीडितास न्याय मिळायला पाहिजे होता. परंतु वरिष्ठांनी देखील त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. हा अन्याय सहन न झाल्याने नाविलाजास्तव रवींद्र साळुंके यांनी आत्मदहन करत आपली जीवनयात्रा संपवली. त्यामुळे सदरील अन्यायग्रस्ताच्या आत्महत्येस जबाबदार धरून सहाय्यक वन संरक्षक मालेगाव, उप वन संरक्षक नाशिक पूर्व, तात्कालीन ताहराबाद वन क्षेत्रपाल शहाणे, सध्याचे ताहराबाद वन क्षेत्रपाल शरमाळे, वनपाल सागर पाटील
ताहराबाद यांची चौकशी करुन त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्यांना तातडीने निलंबीत करण्यात यावे.
सदर चौकशी वा कारवाईची आपण विहित मुदतीत गांभीर्याने दखल न घेतल्यास पीडीतास उचित न्याय मिळवून देणेकामी आपल्या कार्यालयासमोर कोणतीही पूर्व सूचना न देता रिपब्लिकन युवा सेना या संघटने मार्फत उग्र स्वरूपाचे उपोषणे / आंदोलने छेडले जातील असा इशाराही रिपब्लिकन युवा सेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष इम्रान पटेल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111