१०१ रक्तदात्यांनी केले रक्तदान
हिंगोली/विश्वनाथ देशमुख
दि.१९,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव नगरपंचायतच्या वतीने दशक महोत्सव व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दि.१९ फेब्रुवारी बुधवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले व भव्य रक्तदान शिबीरास सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले होते यामध्ये १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.जिल्ह्यामध्ये रक्तपेढी मधील रक्त पुरवठा कमी असल्याकारणाने रक्ताची उणीव गरोदर माता,सिकलसेल रुग्ण,थैलेसीमिया वरील रुग्ण यांना प्रत्येक महिन्याला रक्त द्यावे लागते हि बाब लक्षात घेऊन नगरपंचायतच्या वतीने दशक महोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त नगरपंचायत कार्यालया समोर भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये सेनगांव शहरातील १०१ रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले.या रक्तदान शिबिरास सेनगांव ग्रामिण रुग्णालयाचे अधिकारी डाँ.सुरज शिंदे,रक्त साठवणुक तंत्रज्ञ श्रीमती विद्या तौर,डाँ.संदीप राठोड,डाँ.रेणुका हागे,डाँ.किशोर वानखेडे,डाँ.बालाजी आडे,डाँ.सोहेल शेख,डाँ.अर्पीत यादव यांच्या पथकाचा समावेश होता.
या रक्तदान शिबिरास उप विभागीय अधिकारी समाधान घुटुकडे साहेब यांनी भेट देऊन पाहणी केली.यावेळी मुख्याधिकारी गणेश गांजरे,नगराध्यक्षा मनिषाताई देशमुख,उप नगराध्यक्षा शालीनीताई देशमुख,माजी उप नगराध्यक्ष केलासराव देशमुख,माजी नगरसेवक उमेश देशमुख,रामगोपाल गट्टाणी आदीस नगरपंचायत कर्मचारी सुनिल देशमुख,जगन्नाथ दिनकर,विशाल जारे,पवन देशमुख,कैलास बिडकर,विनायक पडोळे,विजय हनवते,परसराम कोकाटे,रामेश्वर सांगळे,मिथुन सुतार,देविदास सुतार,लक्ष्मण सुतार,बाळु सुतार,विनोद कांबळे,आवेज पठाण यांनी शिबिर यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.