shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी बालक - पालक - शिक्षक यांनी सजग व्हावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे


अकोले:  गुड टच, बॅड टच लक्षात घ्या आणि गप्प बसून अन्याय सोसू नका, व्यक्त व्हा. विकृत मनोवृत्तीच्या गुन्हेगाराला वेळीच आळा घातला नाही तर गुन्हेगार सोकावतो. मोबाईलचा योग्य वापर करा, ११२ नंबर लक्षात ठेवा.पोक्सो कायदा समजून घ्यावा अन् बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी बालक - पालक - शिक्षक यांनी सजग व्हावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांनी केले.

      अकोले तालुक्यातील कळस येथील कळसेश्वर विद्यालयातून अकोले व संगमनेर तालुक्यातील जवळपास चारशे शाळांतील विद्यार्थी शिक्षक पालक यांचे बरोबर व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधत सोनवणे यांनी आवाहन केले. 
    विद्यार्थ्यांनी अनोळखी व्यक्ती पासून दूर राहावे.शाळेत ये - जा समूहाने किंवा पालकांबरोबर यावे. प्रवासात गुड टच, बॅड टच लक्षात घ्यावा, गप्प बसून अन्याय सोसू नये. सजग नागरिकांच्या मदतीने गुन्हेगारास वेळीच समज देवून रोखावे. अनोळखीकडून चॉकलेट, बिस्किट, खाऊ चिजवस्तू घेवू नये.१८ वर्ष वयापर्यंतच्या बालकांसाठी पोक्सो कायदा समजून घ्यावा. पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष द्यावे.विद्यार्थ्यांनी मोबाईल वापर शिक्षणासाठीच करावा. सार्वजनिक ठिकाणी रोडरोमिओ याचा उच्छाद रोखण्यासाठी सजग नागरिकांनी जागृक राहावे असे आवाहन करत शालेय  विद्यार्थी व विद्यार्थिनी बाबत घडणारे गुन्हे  प्रतिबंध व्हावा या उद्देशाने तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या दृष्टीने करिअरचे महत्त्व, बालकांशी संबंधित महत्वाच्या कायद्याच्या तरतुदी, स्वसंरक्षण, पालकांनी घ्यावयाची काळजी या विषयी माहिती दिली.
    प्रास्तविकात अकोले चे पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांनी विद्यार्थी सुरक्षेसाठी ' विद्यार्थी संरक्षण दक्षता समिती ' या बाबत माहिती दिली. संगमनेर लाॅ काॅलेजच्या प्राध्यापिका देवयानी निकम यांनी पोक्सो कायदा विषयी व्याख्यान दिले. 
     स्वागत सरपंच राजेंद्र गवांदे यांनी तर माजी सरपंच भाऊसाहेब वाकचौरे यांनी सुत्रसंचालन केले तर मुख्याध्यापक नंदा बिबवे यांनी आभार मानले. यावेळी अकोले पोलीस यांना वेळोवेळी मदत करणारे तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष नामदेव निसाळ, रामदास वाकचौरे, सौ. माधवी गोरे यांचा सत्कार करण्यात आला.
अकोले संगमनेर तालुक्यातील ४०० शाळा तसेच दोन्ही पंचायत समितीचे गटविकास व गटशिक्षण तसेच शिक्षण विस्तार अधिकारी ऑनलाईन या उपक्रमात सहभागी झाले होते.भविष्यात शाळा परिसर, विद्यार्थ्यांचा वावर असेल अशा ठिकाणी सातत्याने  फिरणाऱ्या मोटरसायकलचे नंबर घेण्याचे काम सुरु झाली आहे अशी माहिती देण्यात आली.
close