shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साई निर्माण महाविद्यालय येथे व्याख्यान उत्साहात संपन्न..!


शिवचरित्र वाचताना जीवन मूल्यांचे दालन समृद्ध बनते - प्रफुल्ल खपके

शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
उत्कृष्ट बातमी 

        साई निर्माण एज्युकेशन हब चे साई निर्माण इंग्लिश मीडियम स्कूल व साई निर्माण ज्युनियर कॉलेज, शिर्डी येथे शिवजयंती उत्साहात संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास भालेकर यांनी सांभाळले, कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान चापेकर सरांनी स्वीकारले, समवेत युवा व्याख्याते प्रफुल्ल खपके, ग्रीन फाउंडेशन उपाध्यक्ष व पत्रकार तुषार महाजन, मुख्याध्यापक गणेश डांगे व संदीप डांगे, अरबाज पठाण, शुभम शेलार, विशाल बेलदार, अविनाश रोकडे आदि मान्यवर उपस्थित होते.

        शिवजयंतीनिमित्त अशाप्रकारे बौद्धिक कार्यक्रमांचे आयोजन हा  विद्यार्थ्यांसाठी दर्शदायी, चारित्र्यसंपन्नता व जीवन मूल्यांचा पाठ घालून देणारा उपक्रम आहे. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे व मासाहेब जिजाऊ यांनी शिवबानां बालपणापासूनच मातृत्वाचे, आदर्शाचे, शूर-वीर पराक्रमाचे धडे दिले. चांगले चांगले सवंगडी सोबतीला दिले म्हणून पुढे हिंदवी स्वराज्य साकार झाले. 
         छत्रपती शिवरायांचे सूक्ष्म नियोजन, गनिमी कावा, युद्धतंत्र या सर्व असामान्य गुण कौशल्यांचा अभ्यास करून अनेक युरोपीय राष्ट्र आदर्श घेतात. यामध्ये अमेरिकेसारख्या महाबलाढ्य शक्तीला आपल्यासमोर नमवणारा व्हिएतनाम सारखा देश महाराजांच्या गनिमी कावा या युद्धतंत्राचा आदर्श घेऊन लढला, छत्रसाल बुंदेला महाराजांचा आदर्श घेऊन बुंदेलखंड हे आपलं राज्य स्वातंत्र्य करून घेतो असे अनेक उदा. प्रफुल्ल खपके यांनी यावेळी दिली.
      स्वराज्यामध्ये स्त्री ही मराठ्यांच्या घरातील देव्हार्‍यामधील देवता समान, अर्थात पर स्त्री ही मातेसमान आहे अशी शिकवण होती. इथली रयत ही शेतकरी आहे आणि शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये असे सैन्याला दिलेले सक्त आदेश महाराजांचे शेतकरी धोरण दर्शवते. महाराजांना त्यावेळेस समजले होते सैन्य हे पोटावरती चालतं पोट भरलेली असली की पाठीचा कणा टाईट राहतो आणि कुठलीही असामान्य लढाई सहज लढता येते. असे स्वराज्याचे विविध पैलू विद्यार्थ्यांसमोर मांडण्याचे काम प्रफुल्ल खपके यांनी केली.       
        विद्यार्थ्यांना इतिहासातील ध्येयवाद, दूरदृष्टीकोण, सूक्ष्म अभ्यास-नियोजन, जिद्द-चिकाटी या गोष्टी भविष्याच्या वाटचालीसाठी गरजेच्या आहेत असे प्रतिपादन केले व यानंतर कार्यक्रमाचा समारोप होऊन आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले.
close