प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज तालुका भाजपा च्या प्रमुख कार्यकर्त्यांनी बीड जिल्ह्यच्या माजी लोकप्रिय खा.प्रीतमताई मुंडे यांचा वाढदिवस जाहिरात व बॅनरबाजी न करता सामाजिक उपक्रम घेऊन मतिमंद व मुख बधिर निवासी विद्यालय उमरी येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ देऊन साजरा करण्यात आला. या वेळी विविध स्पर्धेत सहभाग घेऊन विशेष प्राविण्य मिळवलेल्या मतिमंद व मुखबधीर विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर, जिल्हास्तरावर,व विभागीय स्तरावर वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी करून त्यांना संधी उपलब्ध करून दिली त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून योग्य मार्गदर्शन केले. त्याबद्दल संबंधित शिक्षकांचे अभिनंदन केले या कार्यक्रमास भाजपा चे जेष्ठ नेते सुनील आबा गलांडे,उपसभापती डॉ वासुदेव नेहरकर, तालुका अध्यक्ष भगवान केदार ,रमाकांत बापू मुंडे ,व्यापारी महासंघाचे महादेव सूर्यवंशी, डॉ धनराज पवार,सरपंच महादेव जाधवर, उपसरपंच धीरज वणवे, प्रकाश मुंडे,व लक्ष्मण चौरे व जनार्थ शिक्षक मंडळ यांच्या मुख्यअध्यपिका श्रीमती जाधव मॅडम ,अशोक सुरवसे सर,विशाल कदम सर,बापू शिंदे सर ,अण्णा सोळंके,परशराम सिरसाट सर व विद्यार्थी उपस्थित होते.