shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हिंगोली जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामात दिरंगाई;ठेकेदार व अभियंत्यावर कारवाई करा...

सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल धाकतोडे व लक्ष्मण कबाडे यांची जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे मागणी...


सेनगांव/विश्वनाथ देशमुख

हिंगोली जिल्ह्यातील जलजीवन मिशन कामामध्ये खुप दिरंगाई होत असून अभियंता व ठेकेदार यांचा मनमानी कारभार होत आहे.तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व कामकाजाची चौकशी करुन संबधीत अभियंता व ठेकेदारावर कार्यवाही करण्याच्या मागणीचे निवेदन सुकळी (बु) येथील विठ्ठल धाकतोडे व लक्ष्मण कबाडे यांनी दि.१४ फेब्रुवारी रोजी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिले आहे.



हिंगोली जिल्ह्यातीत महाराष्ट्र शासनाच्या वतीने खेड्यातील शेवटच्या माणसा पर्यंत जलजीवन मिशनच्या माध्यमातून हर घर जल पोहचविण्याचे स्वप्न असुन त्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देत आहे.परंतु या महत्वपुर्ण कामामध्ये प्रशासनाचे अधिकारी व प्रशासनाचे या योजनेमध्ये लक्ष ठेवणारी यंत्रणा ही पुर्णपणे मँनेज झाल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.

बऱ्याच गावामध्ये जल जिवन मिशन अंतर्गत कामे चालु होऊन अतिशय मंद गतीने होत आहे संबधीत कामे चालु झाले तेव्हा पासुन तर काम पुर्ण होण्यासाठी शासनाने नियमावली लाऊन दिलेली आहे परंतु तसे होतांना दिसत नाही किंवा काम झालेले नाही.अनेक गावामध्ये तीन-चार वर्ष या योजनेचे काम चालु आहे परंतु अद्याप लोकांना पिण्यास पाणी मिळत नाही अनेक गावची कामे ही अर्धवट झाल्याचे दिसत आहे.कुठे टाकीचे कामे झाली तर पाईप लाईन नाही.जिथे पाईप लाईन आहे तर जिथे विहीरीचे काम अर्धवट झाले ते ही निकृष्ठ दर्जाचे झाले आहेत.झालेले हे कामे अभियंता व ठेकेदार यांच्या मनोमिलनातुन होत आहेत.

मार्च महिना सुरुवात होण्यास काही दिवस शिल्लक आहेत परंतु कोट्यावधी रुपये खर्च करुन काहीच फायदा होतांना दिसत नाही.आज रोजी सेनगांव तालुक्यातील बहुतांश खेड्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी सर्वसामान्य जनतेला  मोठा त्रास होत असून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.संबधीत जिल्हा परीषद प्रशासन यंत्रणा ही ठेकेदारांच्या दबावाखाली काम करीत असल्याचे दिसत आहे.संबधीत अभियंते हे ठेकेदारांच्या इशाऱ्यावर काम करीत आहेत.केवळ टक्केवारीवर काम करीत आहेत याची चौकशी होणे काळाची गरज आहे व संबधीत अधिकाऱ्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.

संबधीत अभियंते हे कामावर न जाता ठेकेदारांना कुठे तरी बाहेर भेटुन कामाचे मोजमाप पुस्तक तयार करीत असल्याने याची ही चौकशी व्हायला हवी.प्रत्येक कामाची झालेली सुरुवात व काम पुर्ण झाल्याचा कालावधी मध्ये एकाही ठेकेदाराने काम पुर्ण केलेले नाहीत का केले नाहीत याचा खुलासा द्यावा.कालावधीत पुर्ण न झालेल्या ठेकेदारावर व संबधीत अधाकाऱ्यावर अन्य यंत्रणेवर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागण्याचे निवेदन सुकळी बु येथील सामाजीक कार्यकर्ते विठ्ठल रामचंद्र धाकतोडे व सुकळी खु येथील लक्ष्मण रामभाऊ कबाडे यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे केले आहे.

close