मानव सुरक्षा सेवा संघाची मागणी
संगमनेर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
संगमनेर / प्रतिनिधी:
संगमनेर तालुका हा मोठा तालुका असून शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार या तालुक्यात अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. म्हणून मानव सुरक्षा सेवा संघाच्या पुढाकाराने संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक याठिकाणी अप्पर तहसील कार्यालय झालेच पाहिजे याकरीता मानव सुरक्षा सेवा संघ या राष्ट्रीय संघटनेने संगमनेर तालुक्याचे प्रांत अधिकारी शैलेश हिंगे तसेच संगमनेर तालुका महसूल तहसीलदार श्री. गिरी यांना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल राखपसरे, राष्ट्रीय सचिव भारत म्हसे, प्रदेश अध्यक्ष बशीरभाई भुरे , अजित गाढे, प्रदेश अध्यक्ष - (पोलीस मित्र संघटना ), मधुकर मंतोडे माजी सरपंच शिबलापूर, त्रिंबक मगर सामाजिक कार्यकर्ते हरिष उंबरकर, किरण गायकवाड, अनिल म्हसे, संजय वाडेकर, अशोक गुळवे, मोहित गायकवाड, सूरज सांगळे, मधुकर कांगणे, दिलीप लंके या सर्वानी शुक्रवार दि. २१-०२-२०२५ रोजी संगमनेर प्रांताधिकारी आणी तहसीलदार यांना मागणीचे निवेदन दिले.
यामुळे गोरगरीब जनतेचे ग्रामीण भागातील कामे तातडीने होतील व आश्वी बुद्रुक तसेच सर्व परिसराचा चांगला विकास होईल असेही या निवेदनात म्हटले आहे.
वृत प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111