विद्यार्थिनींनी परीक्षेतील गुणांबरोबर नैतिक मूल्य जपणे गरजेचे ... न प मुख्याधिकारी श्री ढोपे*
प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-
जय भवानी कन्या प्रशाला केज येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटपाचा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री देशमुख पी एम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर प्रामुख्याने केज नगरपंचायत चे नवनियुक्त मुख्याधिकारी माननीय ढोपे साहेब, धारूर बस आगाराचे प्रमुख श्रीमान चौरे साहेब, बिक्कड साहेब, समाजसेवक हनुमंत भोसले सर, नगरपरिषद सदस्य श्रीमान बाळासाहेब गाढवे, शिक्षणप्रेमी दत्ताजी काकडे,सावंत साहेब, इंगळे विठ्ठल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना नगरपंचायत केज चे श्री मुख्याधिकारी ढोपे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वतःच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.शालेय जीवनात परीक्षेतील गुण हे अतिशय महत्त्वाचे असतात परंतु हे सांगताना त्यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात नैतिक मूल्याचे महत्त्व कसे आहे हे उदाहरणासहित विद्यार्थिनींना पटवून सांगितले. आचार,विचार, समाजाप्रती आपले देणे,वडीलधाऱ्यांचा सन्मान, देशाप्रती प्रेम,कर्तव्य हे जीवनात अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत मांडले. केवळ पद,पैशाच्या मागे न लागता एक चांगला व्यक्ती म्हणून समाजात प्रतिमा उभी करावी असा आग्रह त्यांनी विद्यार्थिनींना केला.
धारूर आगाराचे प्रमुख श्री चौरे साहेब व बिकड साहेब यांनी विद्यार्थिनींना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिक्षणप्रेमी पालक व साबला गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री काकडे यांनी शाळेचे कौतुक करून सर्व विद्यार्थिनींना व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या तसेच 97 टक्के मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थिनींना पाच हजार रुपयाची रोख बक्षीस जाहीर केले.
शिक्षण क्षेत्रातील नामवंत तसेच समाजसेवक प्रा हनुमंत भोसले सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत केवळ गुण घेणे म्हणजे यश मिळवणे असे नव्हे तर कमी गुण असताना सर्वोच्च पदावर गेलेले अधिकारी व उद्योजक यांची उदाहरणे देत मार्क कमी जास्त मिळतील परंतु संघर्ष महत्त्वाचा हा संदेश दिला.
शाळेचे मुख्याध्यापक श्री देशमुख पी एम यांनी विद्यार्थिनींना मोबाईल चा वापर टाळा पुस्तक वाचा असा संदेश देऊन आई-वडिलांची स्वप्न साकार करण्याचे हेच दिवस असल्याचे सांगितले व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
आभार प्रदर्शन शाळेची ज्येष्ठ शिक्षक श्री खुळे के व्ही यांनी केले यावेळी त्यांनी शाळेतील सर्व नवीन उपक्रम मान्यवरासमोर समोर मांडले उत्तरोत्तर प्रगती करण्याचे आश्वासन दिले व उपस्थितीबद्दल शाळेच्या वतीने आभार मानले.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री गिरी एस एम यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती गीता जगताप सर्वश्री ज्येष्ठ शिक्षक सर्वश्री खुळे के व्ही, नाईकनवरे ए जी, बचुटे एम ए, देशमुख व्ही पी, गिरी एस एम, श्रीमती पवार एस एस, श्री देशमुख पी आर,सौ मोरे मॅडम, सौ जाधव मॅडम, सौ खतिले मॅडम शिंदे बी एम, कुलकर्णी मॅडम,शोएब सय्यद श्री गिराम बी एम. यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी व पालक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.