shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवरामपुरी मठ संस्थान कायमच आमचे ऊर्जास्त्रोत- आ नमिता मुंदडा..!!

वरपगाव येथील एक कोटी रुपयांच्या सभामंडपाचे लोकार्पण 
============================
प्रकाश मुंडे /बीड जिल्हा प्रतिनिधी:-                         वरपगाव येथील शिवरामपुरी मठ संस्थान हे कायमच आमचे श्रद्धास्थान राहिलेले आहे इथुन मिळणारी ऊर्जा आम्हाला कायमच लोककल्याणकारी कामे करण्यास सतत प्रेरणा देणारी राहिली असल्याचे उदगार आ .नमिता मुंदडा यांनी महंत रामकृष्ण महाराज वरपगावकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रम व सभामंडपाच्या लोकार्पण कार्यक्रमात काढले. 


तालुक्यातील वरपगाव येथील शिवरामपुरी 
मठसंस्थान व येथील महंत कै रामकृष्ण महाराज यांच्यावर श्रद्धा असणारे भाविक लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रत आहेत याठिकाणी वर्षभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते .या कार्यक्रमांना असंख्य लोकांची उपस्थिती असते पण हे धार्मिक कार्यक्रम होण्यासाठी याठिकाणी सभामंडपच नसल्याने गैरसोय होत होती हि बाब आ. नमिता मुंदडा यांच्या लक्षात आल्याने त्यांनी यासाठी विशेष प्रयत्न करत प्रादेशिक पर्यटन विकास निधी अंतर्गत येथे भव्य सभामंडप होण्यासाठी एक कोटींचा निधी मंजूर करून घेतला होता .या कामाचे भूमिपूजन सहा महिन्यांपूर्वी होऊन कै .रामकृष्ण महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त होणाऱ्या सप्ताहापर्यंत याचे काम पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला होता .

त्यानुसार रामकृष्ण महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित काल्याच्या कीर्तनावेळी मठाचे महंत हभप भगवान महाराज यांच्या हस्ते या भव्यदिव्य सभामंडपाचे लोकार्पण करण्यात आले यावेळी भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा काकाजी , राजेसाहेब देशमुख , सुनील गलांडे , ऋषिकेश आडसकर , नेताजी शिंदे , शरद इंगळे ,भगवान केदार ,  हनुमंत भोसले , धनंजय देशमुख , महादेव अण्णा सूर्यवंशी , लिंबराज फरके , सुरज घुले , सुरेश नांदे , शिवाजी पाटील , खदीर कुरेशी , संतोष जाधव , व मठ संस्थानच्या विश्वस्तांसह हजारो भक्तांची उपस्थिती होती.
close