आपला पोटचा गोळा मृत्यूच्या दाढेत असताना एक माता आपले मंगळसूत्र विकते आणि एक लाख रूपये जमा करते. तरीही ते पैसे कमी पडत असतात. काय करावे आणि उपचारासाठी लागणारी रक्कम कुठून जमा करायची, अशा विवंचनेत त्या मुलाचे आई वडील असतानाच अचानक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना याबाबत माहिती मिळते आणि त्यांनी तत्काळ मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर यांना त्या मुलावर मोफत उपचारासाठी कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यातून भामरागडच्या त्या अतिदुर्गम भागातील सुनील पुंगाटी वर नागपूरच्या खासगी रुग्णालयात आता पूर्णपणे मोफत आणि चांगले उपचार सुरू आहेत. अवघ्या एका मिनीटात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ कारवाई करून त्यांच्यातील संवेदनशीलपणा आणि कारवाईसाठी असलेली तत्परता दाखवून दिली.
ही केवळ एक घटना नाही. एकीकडे गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील सुनील पुंगाटीच्या मोफत उपचाराची व्यवस्था करत असतानाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांचा जम्मू काश्मीर मध्ये रस्ते अपघात झाला आणि ते ते कोमामध्ये गेले होते. देवेंद्रजींना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी गजभिये यांना मुंबईत आणण्याकरीता एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली आणि लिलावती रूग्णलयात दाखल केले. इतकेच नाही तर रुग्णालयात जाऊन गजभिये यांची भेट घेतली व त्यांना सर्वोत्तम उपचार मिळतील याबाबत जातीने लक्ष घातले.
देवेंद्रजींची जनतेप्रती असलेली संवेदनशीलता अशा अनेक घटनांमधून पाहायला मिळाली आहे मग कोविड काळात एका चिमुकलीसाठी आवश्यक असलेल्या १६ कोटींच्या इंजेक्शनवरील ६ कोटींची सेन्ट्रल एक्साईज ड्युटी देवेंद्रजी यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याशी बोलून 6 कोटी रुपयांची ड्युटी माफ करून घेतली. वास्तविक मुख्यमंत्री या जबाबदारीने उद्धव ठाकरे यांनी हे काम करायला हवे होते पण विरोधी पक्षनेता असूनही देवेंद्रजींंनी ही जबाबदारी स्विकारली आणि त्या चिमुकलीचा जीव वाचवला. कर्जतचा वेदांत ठाकरे नावाचा चिमुरडा थॅलेसेमिया नावाच्या दुर्धर आजाराशी झुंज देत होता पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याचे पालक हतबल झाले होते. अशावेळी देवेंद्रजी अक्षरशः देवदूतासारखे त्यांच्या मदतीला धावुन आले आणि वेदांतच्या उपचाराची जबाबदारी घेत त्याचा जीव वाचवला. देवेंद्रजींनी अशा अनेक बालकांचे प्राण वाचवून त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे.
राज्यातील कोणीही व्यक्ती मग ती श्रीमंत असो अथवा गरीब उपचारापासून वंचित काहू नये ही देवेंद्रजींची पहिल्यापासून भूमिका आहे. आणि त्यातूनच २०१४ मध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच त्यांनी मुृख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन केला. इतकेच नाही तर उपमुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून जानेवारी, 2024 पासून ते ऑगस्ट 2024 पर्यंत अवघ्या 8 महिन्यात 323 रुग्णांना एकूण 12 कोटी 73 लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
राजकारण म्हणजे केवळ सत्तास्पर्धा, आरोप-प्रत्यारोप, कटकारस्थानं यापुरतं मर्यादित नसतं. ते समाजसेवेचं एक प्रभावी साधनही ठरू शकतं, हे महाराष्ट्राच्या राजकारणात काही नेते पुन्हा पुन्हा सिद्ध करतात. अशाच नेत्यांमध्ये नाव घ्यावं लागतं देवेंद्र फडणवीस यांचं. राजकीय शत्रुत्व आणि मतभेद बाजूला ठेवून माणुसकीला प्राधान्य देणारा हा नेता अनेकांच्या जीवनात आशेचा किरण ठरत आला आहे.
*विरोधी पक्षातील आमदारांनाही आधार*
राजकारणात अनेकदा सत्ताधाऱ्यांचा निधी आणि सहकार्य हे पक्षनिष्ठेनुसार वाटलं जातं. मात्र, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी या परंपरेला छेद दिला. विरोधी पक्षातील आमदारांनाही सत्ताधारी आमदारांइतकाच निधी दिला. यामुळे त्यांच्याविषयी विरोधी पक्षातही आदर आणि जवळीक निर्माण झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांची मदत करताना देवेंद्रजींनी दाखवलेला हा केवळ राजकीय सौजन्याचा भाग नव्हता, तर एक संवेदनशील नेत्याची जबाबदारी होती.
*राजकारणापलीकडे जाणा-या संवेदना*
राजकारणात कट-कारस्थानं, मतभेद, संघर्ष हे असतातच, पण सत्तेच्या पलिकडेही काही मूल्यं असतात. राजकीय वैर मनात न ठेवता, कोणत्याही पक्षाच्या नेत्याला किंवा सामान्य माणसाला मदत करणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं वेगळं स्थान आहे. म्हणूनच विरोधी पक्षातील आमदारांनाही ते आपलेसे वाटतात. अनेकांना ते ‘देवाभाऊ’सारखे भासतात. महाराष्ट्राच्या राजकीय पटावर असे संवेदनशील नेते नेहमीच प्रकाशाचा मार्ग दाखवत राहतात.
संकलन:-
श्री. भाऊसाहेब वाकचौरे पाटील
जिल्हा संयोजक, भाजपा, सोशल मीडिया सेल, उत्तर नगर