shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

हेमंत मुसरीफ यांच्या छान कविता..!

महात्मा ...

ब्रीद वाक्य  बापूंचे
अहिंसा परमो धर्म
धर्माच्या नावे  युद्ध
आमचे असे कुकर्म

स्वच्छता प्रिय तया
आम्हा न कळे मर्म
मन आमचे गलिच्छ
तरीही न वाटे शरम

सत्याग्रह    अनुग्रह
बापू  नवनीत  नरम
आम्ही  हिंस्र लांडगे
पांघरतो  व्याघ्र चर्म

स्वातंत्र्यास्तवतुरूंग
सोसला त्रास  चरम
तुरूंगवारी चुकवतो
आम्ही करे कु करम

पीडा पराई जानी रे
कळले न कधी मर्म
स्वार्थासाठी  सहज
बनतो आम्ही बेशर्म

अंत्योदय रे सूर्योदय 
सत्यमशिवम् सुंदरम्
गांधीवाद सार्थसंवाद
नको  कसला संभ्रम 

2
अमोल जीव ..

संपवले ते उपोषण
घडले सारे  अद्भुत
गांधीवाद जागृतता
मिळाले पुन: सबूत

टळले प्राण  संकट
स्त्रवे  जीवन अमृत
अनमोल रे आयुष्य 
जीवाचे करे आदृत

श्रेय घ्यायला तयार 
मी काढली समजूत 
आपणचं  सर्वे सर्वा
करुन घेता समजूत 

पोट भरुन प्रसिध्दी
काही  पक्ष मजबूत
धुवूनघ्यायचे रे हात
डोक्यावरबसवे भूत

जीव एकाचे पणास
बाकीचे खेळती द्युत
झटके बसे  एकाला
दुज्या घरात  विद्युत 

एक उपोषण संपन्न
सगळीकडे येई  उत
प्राणाशी नका  खेळू
मनोवृत्ती का विकृत

- हेमंत मुसरीफ पुणे. 
  9730306996.
  www.kavyakusum.com

close