प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी केज तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मिडिया पञकार परिषदेच्या केज तालुका अध्यक्ष पदी रामदास तपसे तर सचिवपदी प्रकाश मुंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
मराठी पत्रकार परिषदेच्या विश्वस्त एस. एम. देशमुख सर, डिजिटल मीडिया राज्यकार्याध्यक्ष अनिल वाघमारे, डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिनकर शिंदे सर यांच्या सूचनेनुसार केज येथे सक्रिय पञकार संघाच्या कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीला तालुका मराठी पत्रकार परिषदेचे केज तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष विजय आरकडे ,जिल्हा उपाध्यक्ष गौतम बापु बचुटे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे सुहास चितद्रवार ,दशरथ चौरे व डि.डी.बनसोडे बापू यांच्या उपस्थितीत सदरील बैठक पार पडली. यावेळी सर्वानुमते मुद्देसूद चर्चा करून पुढील कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्ष रामदास तपसे,सचिव प्रकाश मुंडे, उपाध्यक्ष अजय भांगे,संघटक सन्नी शेख तर कार्याध्यक्षपदी इक्बाल शेख व मार्गदर्शक म्हणून राजेभाऊ कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.
सदरील बैठकीला संतोष गालफाडे,रमेश गुळभुले, महादेव गायकवाड, नंदकुमार मोरे,मुब्बशीर खतीब व इतर मान्यवर पञकार बांधव उपस्थित होते.
अखिल भारतीय स्तरावर पत्रकारांच्या नया हक्कासाठी लढा देणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.