यवतमाळ: शिर्डी एक्सप्रेस वृत्त सेवा -:
यवतमाळ शहरातील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह यवतमाळ व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह यवतमाळ दोन्ही वसतिगृहाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनीच्या कलागुणांना वाव म्हणून वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यात आले.तर 25 जाने रोजी अभ्यंकर कन्या शाळा यवतमाळ येथे क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.
यामध्ये रनिंग, क्रिकेट, रस्सीखेच, कबड्डी, हॉलीबॉल इ. स्पर्धा घेण्यात आल्या तसेच २६ जाने २०२५ रोजी स्नेहसंमेलन मुलींचे शासकीय वसतिगृह यवतमाळ येथे घेण्यात आले यामध्ये वेशभूषा, नृत्यस्पर्धा, गीतगायन स्पर्धा, मॉडेलिंग, इ. घेण्यात आल्या सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून श्रीमती तिजारे, जोशी, प्रमुख अतिथी श्रीमती नीता महल्ले, श्रीमती तन्वी ब्रामने मंडम, वसतिगृहाच्या गृहपाल श्रीमती शीतल ल. तेलंगे, गृहपाल श्रीमती स्मिता महल्ले, उपस्थित होत्या तर सूत्रसंचालन कु. प्राजक्ता भगत तर आभार प्रदर्शन मंदिरा ठावरी यांनी केले. यामध्ये सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला.