shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय संविधान हेच राष्ट्रधर्माचा धर्मग्रंथ आहे - प्रा. डॉ.बाबासाहेब पवार

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
भारतीय राज्यघटनेने भारताला एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक गणराज्य म्हणून स्थापित केले आहे. भारताच्या या ऐतिहासिक परिवर्तनात्मक क्षणाचा सन्मान हा संविधानाचा गौरव आहे असे विचार प्रा.डॉ.बाबासाहेब पवार यांनी व्यक्त केले.


तालुक्यातील बेलापूर येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित संविधान गौरव महोत्सवात ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे या होत्या सदर प्रसंगी व्यासपीठावर प्रा.डॉ. किशोर गटकळ, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.चंद्रकांत कोतकर, प्रा.रुपाली उंडे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ.संजय नवाळे व आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. पवार म्हणाले की भारतीय संविधानाने सर्वधर्मसमभावाचे तत्त्वज्ञान सांगितले असून राज्यघटना हाच सर्व भारतीयांचा धर्मग्रंथ आहे त्यामुळे या धर्मग्रंथाची ओळख सामान्यातल्या सामान्य माणसाला झाली पाहिजे. सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय तसेच समता आणि स्वातंत्र्य यांची जपणूक केली तरच राष्ट्राची एकता आणि एकात्मता राखणारी बंधुता आपण निर्माण करु व आपण या भारत देशात स्वाभिमानाने व निर्भयपणे जीवन जगू शकू म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचे पालन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. यावेळी प्रा. डॉ. किशोर गटकळ यांनी संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगून महत्त्वाच्या कलमांवर चर्चा केली.
         सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन केले व कायद्याचे अधिराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गावामध्ये संविधान रॅली काढली,  बेलापूर येथील झेंडा चौकामध्ये उद्देश पत्रिकेला माजी विद्यार्थी विशाल मेहत्रे यांच्या हस्ते हार घालून पूजन करण्यात आले. या वेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने महाविद्यालयात निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदवण्याचे आव्हान प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी केले .सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. रूपाली उंडे यांनी केले तर आभार प्रा.चंद्रकांत कोतकर यांनी मानले.रॅली आयोजनासाठी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
close