*राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा टिकवण्यासाठी प्रयत्न करणार - कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे.*
शिक्षक समिती पुणे जिल्हा शाखेच्या वतीने कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन सादर.*
इंदापूर : दि 9 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पुणे जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक कल्याण अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना भरणेवाडी येथील निवासस्थानी 15 मार्च 2024 संचमान्यता शासन निर्णय रद्द करावा 20 पटाच्या आतील शाळावर दोन शिक्षक ठेवून ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे व शाळा टीकाव्या याकरिता निवेदन देण्यात आले.
यावेळी भरणे यांनी शासन स्तरावर प्रयत्न करू असे सांगितले. प्रसंगी पुणे जिल्हा शिक्षक समिती उपाध्यक्ष ज्ञानदेव बागल , पदवीधर शिक्षक अनिल दिवसे, सुग्रीव मिटकल , विट्ठल सोनटक्के , लालचंद खोमणे, नामदेव गुंड , सहदेव काळेल , भूषण जौजाळ , भारत ननवरे , संचालक प्रताप शिरसट, शिवाजी जाधव, आण्णासाहेब करळे, संतोष हेगडे उपस्थीत होते.